पुणे, दि.५: जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक सभा ६ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावरील सभागृहात होणार आहे. नागरिकांनी त्यांचे अर्ज बैठकीच्या दिवशी दाखल करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य सचिव हिम्मत खराडे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग सदस्यांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दौरा रद्द
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. निलीमा सरप- लखाडे आणि प्रा. डॉ. गोविंद काळे यांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ६ एप्रिल २०२३ रोजीचा नियोजित दौरा काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आला आहे, असे आयोगाचे सदस्य सचिव आ. उ. पाटील यांनी कळविले आहे.

