काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवेंंकडे निवडणुकीला उभे राहू देणार नाही,गोळ्या घालून जीवे मारु धमकी देत ३० लाख खंडणीची मागणी

Date:

पुणे : काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून अज्ञाताने ३० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आठवड्यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे माजी सभागृहनेते,नगरसेवक गणेश बिडकर यांना धमकावून २० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तत्पूर्वी माजी महापौर मोहोळ यांचा मोबाईल हॅॅक करून त्यांच्या नावाने त्यांच्याच परिचिताला ३ करोड ची खंडणी मागण्यात आली होती .राजकीय नेत्यांंना धमकावून खंडणी मागण्याच्या घटना एकापाठोपाठ घडल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मोहोळ यांच्या प्रकरणात दोघांना अटक झाली असली तरी मास्टर माइंड शोधण्यात अद्यापही यश आल्याचे दिसत नाही तर बागवे आणि बिडकर यांना खंडणी मागणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. बागवे यांचा भवानी पेठेतील कासेवाडी परिसरातून निवडून आले होते. कसबा विधानसभा निवडणुकीत बागवे यांची भूमिका महत्वपूर्ण राहिलेली आहे. ते माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे सुपुत्र आहेत .अभ्यासू आणि आक्रमक नगरसेवक अशी ओळख असलेले अविनाश बागवे महापालिकेतील अनेक घोटाळे, नियमबाह्य कामे बाहेर काढण्यात ते वाकबगार आहेत

अविनाश रमेश बागवे (रा. पद्मजी पार्क, भवानी पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बागवे यांच्या मोबाइलवर अज्ञाताने दूरध्वनी (व्हाॅटसॲप काॅल) केला. त्यांना धमकावून ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास निवडणुकीला उभे राहू देणार नाही. गोळ्या घालून जीवे मारु तसेच राजकीय कारकीर्द संपवून टाकू, अशी धमकी अज्ञाताने बागवे यांना दिली. बागवे यांनी पोलिसांकडून तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर तपास करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...