दुबई, बंगळूर, अबुधाबी, दोहा हे एयर इंडियाच्या वाहतुकीचे सर्वात प्रमुख स्त्रोत 

Date:

पुणे-, एप्रिल २०२३: एयर इंडियाच्या दोन उपकंपन्या एयर इंडिया एक्सप्रेस आणि एयरएशिया इंडिया यांचे एकत्रित ग्राहक इंटरफेस व्यासपीठ  (एयरइंडियाएक्सप्रेस.कॉम) airindiaexpress.com लॉंच झाल्यापासून काही दिवसांतच त्यास भेट देणाऱ्या ग्राहकांची वर्दळ वाढली असून पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय उत्पादनात २५% पेक्षा जास्त योगदान देऊन ते आरक्षणाचे प्रमुख एकमेव स्त्रोत बनले. दोन्ही एयरलाइन्सनी प्रवास करणारे आता airindiaexpress.com वरूनच लॉग इनबुकिंग आणि आरक्षण व्यवस्थापित करणे ही कामे करत आहेत. नवीन वेबसाइट दोन्ही एयरलाइन्सच्या एकत्रीकरणातील एक प्रमुख टप्पा म्हणून लाँच करण्यात आली आहे.

          airindiaexpress.com हे टाटा कन्सल्टंसी सर्विसेसने टाटा डिजिटलच्या सहाय्याने विकसित केलेल्या पुरस्कार विजेत्या एयरएशिया इंडिया वेबसाइटच्या व्यासपीठावर तयार केले असून ते एयरइंडिया एक्सप्रेसच्या ग्राहकांना  या ऐतिहासिक प्लॅटफॉर्मवरुन लक्षणीयरीत्या सुधारित बुकिंगसमर्थन आणि प्रवास अनुभव प्रदान करते. ही नवीन वेबसाइट बाजारात आल्यामुळे एकाच सामाईक आरक्षण आणि चेक इन पद्धतीने या दोन विमान कंपन्यांच्या संपूर्ण परिसंस्थेला एकत्रित केले आहे.

          आरक्षण प्रणालीच्या यशस्वी लॉंच नंतर विमान कंपन्या आता भारतातील सर्व आंतरराष्ट्रीय टर्मिनल्सवर टप्प्याटप्प्याने विमानलतळावरील कॉमन चेकइन प्रणालीमध्ये आणि त्यानंतर परदेशातील नेटवर्कमध्ये कपात करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.

          airindiaexpress.com च्या काही ठळक वैशिष्ठ्यांमध्ये ही खालील  वैशिष्ठ्ये समाविष्ट आहेत:

    टाटा निओ आणि टाटा निओ पास रिवॉर्डचे अन्य सहभागी ब्रॅंडससह एकत्रित सिंगल साइन ऑन (SSO) क्रेडेंशियल्स

   वैयक्तिक तपशीलप्रवास दस्तावेज, बुकिंग मध्ये पाहुण्यांची नावे सहज अगदी एका क्लीकने जोडण्यासाठी कुटुंबियांची आणि मित्रमंडळींची नावे त्यात आधीच नोंदीत असणेएसएमइ (SMEs) साठी जीएसटी तपशीलपूर्वीचे आणि आगामी बुकिंग्सची माहिती आणि वैयक्तिक ऑफर्स व वाउचर्स या सर्वांसह वैयक्तिक खाते प्रोफाइल

    वापरकर्त्यांनी जर बुकिंग मधेच अर्धवट सोडले असल्यास ई -कॉमर्स शैलीतील शॉपिंग कार्टएकत्रित सिंगलसाइन ऑनसह (SSO) त्यांचे बुकिंग अखंडपणे सुरू ठेवण्यास सक्षम करते.

    एकाच पानावर वर्टिकल स्टॅक एकॉर्डीअन शैलीने बुकिंग फ्लोविमानशोध आणि पैसे भरणे यामधील वेळ कमी करून एक अतिजलद आणि कार्यक्षम बुकिंग अनुभव प्रदान करते.

  एकात्मिक बुकिंग विजेट त्याच पीएनआर वर वैयक्तिक ऑफर्सची हमी देत वेगवेगळ्या प्रोफाइलच्या प्रवाश्यांना जसे- ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थीडॉक्टरपरिचारिका आणि सैन्य दलातील सदस्य व त्यांचे जवळचे नातेवाईक – विशेष भाडे आणि फायदे प्रदान करते.

 प्रत्येक प्रवाश्याला बुकिंग करताना लिंग-तटस्थ सन्मान वापरण्याचा पर्याय

     एक्सप्रेस चेक इन- उद्योगक्षेत्रातील सर्वात जलद -५ सेकंद चेक इनजे जागतिक स्तरावर आधीच बेंचमार्क स्तरावरील नेट प्रमोटर स्कोअर (वापरकर्त्यांनी दिलेले गुणांक) मिळवत आहेज्यामध्ये ८०% पेक्षा जास्त वापरकर्ते ९ किंवा १० गुणांक देत असून ते याबाबत आपल्या मित्रमंडळींना व कुटुंबीयांना शिफारस करतील असे सांगत आहेत. 

airindiaexpress.com वरील जवळपास अर्धे बुकिंग हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधून झालेले आहे, ज्यामध्ये दुबई शहर हे सर्वात जास्त प्रवासी रहदारीचे स्त्रोत असून अन्य सर्वाधिक प्रवासी रहदारीचे स्त्रोत अबुधाबीदोहाशरजाह आणि सिंगापूर आहेत. या व्यासपीठावर झालेले बुकिंगस आणि वाहतूक अधिकतर बंगळूरदिल्ली आणि मुंबईसारख्या मेट्रो बाजारपेठांमधून आले आहेतजे एयरएशिया इंडिया चे देशांतर्गत नेटवर्क आणि हब्स प्रतिबिंबीत करतात.

एकत्रि‍करणाचा एक भाग म्हणून ब्रॅंड कम्युनिकेशन्स आणि सहाय्य सुद्धा ट्विटरफेसबूकइन्स्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या कॉमन सोशल मिडियावर हलवले आहेत. ऑनलाइन प्रतिष्ठा व्यवस्थापन साधने (ऑनलाइन रेप्यूटेशन मॅनेजमेंट टूल्स) सूचित करतात कीजलद प्रतिसाद आणि जलद रिझोल्युशनची वेळनवीन वेबसाइट व सहाय्य चॅनेलच्या वापरकर्त्यांच्या मोठ्या प्रमाणात सकारात्मक भावना आणि अभिप्राय यांच्यामुळे एकात्मिक सोशल मिडिया हॅंडल्सना सर्व भारतीय विमान कंपन्यांमध्ये सर्वाधिक सामाजिक प्रतिष्ठा गुणांक आहे. प्रगत एआय (AI) संचलित संभाषणात्मक आणि बहूभाषिक चॅटबॉट  Tia  दोन्ही एयरलाइन्ससाठी समान व्हाटस अॅप नंबरफेसबूक मेसेंजर आणि कॉमन वेबसाइटवर अखंड २४*७ ग्राहक सहाय्य प्रदान करेल.

एकात्मिक शाश्वतता धोरणासह ही वेबसाइट प्रवाश्यांना प्रत्येक बुकिंगसाठी एक झाड लावून भौगोलिक स्थान दर्शित केलेल्या यूआरएन (URN) प्रमाणपत्रासह त्यांचे कार्बन फूटप्रिंट कमी करण्याची संधी देखील देते.

कॉर्पोरेट आणि रीटेल ट्रॅव्हल एजंट्ससाठी एकाच प्लॅटफॉर्मवरुन तयार केलेले आणि उपलब्ध असलेले एक ट्रॅव्हल एजंट पोर्टल या मोठ्याप्रमाणात विभक्त अशा बाजारपेठेतील आणखी एक प्रमुख ऑफर आहे. ट्रॅव्हल एजंट पोर्टल मॅन्युअल हस्तक्षेपाची गरज काढून टाकत स्वयंचलित फंड अपलोड करण्याचा पर्याय प्रदान करते. हे प्लॅटफॉर्म पूर्णपणे स्वयंचलित असून ते ट्रॅव्हल एजंटना भाडे मिळवण्यापासून ते वाटाघाटीपर्यंत वैयक्तिक आणि गट बुकिंग सुलभतेने हातळण्यास सक्षम करते.

या एकात्मिक व्यासपीठाला मिळणाऱ्या या अत्यंत चांगल्या व सकारात्मक प्रतिसादावर भाष्य करताना एयरइंडिया एक्सप्रेस आणि एयरएशिया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. आलोक सिंग म्हणाले, एयरइंडिया एक्सप्रेस आणि एयरएशिया इंडियाच्या एकत्रीकरणाचा प्रारंभीक टप्पा विक्रमी वेळेत जोरदारपणे पार पडला आहे. आपल्याकडे जी अधिक प्रबळ होती अशा (लिगसी सिस्टम) वारसा प्रणालीकडून आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाकडे यशस्वीरीत्या स्थलांतरित झालो आहोत. संबंधित टेक सोल्युशन्सच्या अतिरिक्त केलेल्या जोडसह एयर एशिया इंडियाच्या विद्यमान मजबूत गुणधर्मांचा फायदा घेऊन हे बदल केले आहे. नव्याने लॉंच केलेल्या airindiaexpress.com ला मिळालेल्या या सुरुवातीच्या उत्कृष्ट प्रतिसादाने आम्ही खूप उत्साही व आनंदी आहोत. एकीकृत ग्राहक अनुभव हा आमच्या एयरइंडिया नेटवर्कचे अधिक सामर्थ्य आणि अधिक व्याप्ती दाखविण्याच्या उद्दिष्टाचा एक महत्वाचा पैलू आहे. आम्ही अजून नवीन अनोखी वैशिष्ठ्ये आणि एकात्मिक सेवा जोडण्यावर काम करीत आहोतजेणेकरून ग्राहकांना अजून जास्त समृद्ध अनुभव मिळेल आणि त्यांच्या मनात आमचे स्थान अजून मजबूत होईल.

एयरएशियाइंडिया देशभरातील १९ ठिकाणांहून उड्डाण करते टर एयर इंडिया एक्सप्रेस २० भारतीय शहरांमधून १४ आंतरराष्ट्रीय स्थळांसाठी उड्डाण करते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...

इंद्रायणी आणि पवना नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी 826.62 कोटींचा मेगा आराखडा!

इंद्रायणी नदी परिसरातील देहू–आळंदीसह ३० गावे आणि पवना नदी...

प्रज्ञा सातव राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या व पैशाच्या जोरावर फोडाफोडीचे भाजपाचे गलिच्छ राजकारण: नाना पटोले

‘काँग्रेसमुक्त’ भारत करणाचे स्वप्न पाहणारा भाजपाच ‘काँग्रेसयुक्त’ झाला, काँग्रेस...