पुणे – गृहरचना स़स्थांकडून अकृषिक कर (एनए टॅक्स) वसुलीत बळजबरी करु नये अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.
अनेक गृहरचना स़स्थांकडून एनए टॅक्सच्या वसुलीत बळजबरी केली जाते अशा तक्रारी आहेत असे जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी निदर्शनास आणून दिले. या कर वसुली बाबत पारदर्शकता असावी. कर आकारणी कशा पद्धतीने केली जात आहे? याचे योग्य ते मार्गदर्शन प्रशासनाकडून केले जावे, शिवाय कर आकारणीला स्थगिती देण्यात आली होती, त्या कालावधीतील करावरचे व्याज आकारु नये असेही आमदार शिरोळे यांनी सांगितले.
गृहनिर्माण संस्थांसाठी असलेला एनए टॅक्स कायमस्वरूपी रद्द करावा अशा मागणीचा पुनरुच्चार आमदार शिरोळे यांनी केला. यासंबंधात गेल्या पंधरवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिल्याची माहिती त्यांनी सांगितली.

