Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मोहन जोशी खोटारडे … पानशेत पूरग्रस्तांचा प्रश्‍न भाजपनेच सोडविला… आमदार माधुरी मिसाळ

Date:

पुणे – कॉंग्रेसचे मोहन जोशी खोटारडे असून पानशेत पूरग्रस्तांचा प्रश्‍न भाजपनेच सोडविला आहे असा दावा आज भाजपचे  आमदार माधुरी सतीश मिसाळ यांनी येथे केला . पुणे महापालिकेच्या निवडणुकीत यश मिळविण्यासाठी हे आणखी काय काय खोटारडेपणा करतील, कशाचेही श्रेय लाटायचे प्रयत्न करतील पण काँग्रेसमुक्त  पुणे महापालिका होईल आणि इतिहास घडेल असे त्या म्हणाल्या .
या संदर्भात त्यांनी म्हटले आहे कि , पानशेत पूरग्रस्तांचे राहते गाळे मालकी हक्काने पूरग्रस्तांना मिळावे या संबंधात २२ मार्च १९९१ रोजी गोपीनाथ मुंडे यांनी तत्कालिन अध्यक्षांच्या परवानगीने विनंती अर्ज विधानसभेत सादर केला. त्यानुसार विधानसभेचे तत्कालिन उपाध्यक्ष मोरेश्‍वर टेंभुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली. समितीने वसाहतींना भेटी दिल्या, साक्षी नोंदवुन घेतल्या. त्यानंतर झालेल्या बैठकीत पानशेत पूरग्रस्तांची घरे मालकी हक्काने देण्याचा निर्णय घेण्यात आला.
१ फेब्रुवारी १९७६ रोजीची जमिनीसह गाळ्याच्या किंमतीवर गाळेधारकांना गाळे देण्याचे ठरविण्यात आले. गाळ्याच्या कमाल किमतीच्या २० टक्के सूट देण्याचे ठरले. १९६५ पासून १९९१ पर्यंत सत्तेत असणार्‍या कॉंग‘ेस पक्षाने पानशेत पूरग‘स्तांना वार्‍यावर सोडले होते. परंतु गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नातून म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या पाठपुराव्यामुळे मालकी हक्काचा प्रश्‍न मार्गी लागला.
निश्‍चित केलेली रक्कम गाळेधारकांनी भरली, परंतु आजही अनेक पूरग‘स्तांच्या राहत्या जागेची प्रॉपर्टी कार्डवर नोंद झालेली नाही, त्यांना मिळकत प्रमाणपत्र मिळालेले नाहीत, वारसाहक्काने नावे नोंदविताना अउचणी येत आहेत. त्यामुळे बँकेचे कर्जही उपलब्ध होऊ शकत नाही. सहकारनगर, पद्मावती, चतुःशृंगी आदी भागातील १०३ सोसायट्यांना मालकी हक्क देण्याचा निर्णय झालेला नव्हता. महसुल पुनर्वसन व मदत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचा निर्णय शनिवारी घेतला. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ता. १२ जुलै १९६१ रोजी पानशेत धरण फुटून पुणे शहरात महापूर आला. पूरग‘स्तांचे १३ विविध वसाहतींमध्ये पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसन करण्यासाठी शासनाने लक्ष्मीनगर, महर्षीनगर, दत्तवाडी, शिवदर्शन, सहकारनगर, गोखलेनगर, नागपूर चाळ, वडारवाडी, जनवाडी अशा शहराच्या विविध तेरा वसाहती बांधल्या.
पूर आल्यानंतर पाच-सहा वर्षांत या वसाहती उभ्या राहिल्या, त्यावेळी घाईघाईत बांधकाम झाल्याने त्यांचा दर्जा तितकासा चांगला नव्हता. हे सर्व बांधकाम सिंगल विटेचे होते. जुने घर कमकुवत झाल्याने व कुटुंबातील सदस्यांची सं‘या वाढल्याने लोकांनी आपल्या ऐपतीनुसार घरांची दुरूस्ती व वाढीव बांधकामे केली.
पानशेत पूरग‘स्तांच्या घरांचा मालकी हक्काचा प्रश्‍न जसा महत्वाचा आहे. तसाच पूरग‘स्त वसाहतीत रहिवाशांनी केलेली वाढीव बांधकामे नियमित करण्याचा प्रश्‍न महत्वाचा आहे आणि तो सोडविण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी पुणे विकास आराखड्यात म्हाडा वसाहतींसाठी चार एफएसआय देण्याबाबत त्रिसदस्यीस समितीने शिफारस केले असल्याची बाब मी निदर्शनास आणून दिली. साईट व फ्रंट मार्जिनमध्ये रिलॅक्सेशन, आणि वाढीव एफएसआय ची मगणी केली त्यामुळे ही वाढीव बांधकामे नियमित होऊ शकतात हे निदर्शनास आणून दिले. त्यानुसार विकास आराखड्यानुसार वाढीव बांधकामे नियमित करण्याबाबतच्या सूचना महसुलमंत्र्यांनी दिल्या.
कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या अभ्यासू लोकप्रतिनिधींना पानशेत पूरग्रस्तांचे प्रलंबित प्रश्‍न कधी समजलेच नाहीत असे खेदाने म्हणावे लागेल. त्यामुळे आता हा प्रश्‍न मार्गी लागत आहे हे लक्षात आल्यानंतर नैराश्याच्या भावनेतून माजी आमदार मोहन जोशी यांनी टीका केली आहे. कॉंग्रेस आघाडीच्या कारभाराला कंटाळून लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी काँग्रेस पुणे मुक्त केली आहे. आता आगामी महापालिका निवडणुकीतील पराभव दिसू लागल्याने माजी आमदार मोहन जोशी बेताल आरोप करीत आहेत
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोकमान्यनगर प्रश्न पेटला; शेकडो नागरिकांचा घंटानाद आंदोलनातून सरकारला इशारा !

“घर आमच्या हक्काचं!”—काळे झेंडे, काळ्या कपड्यांसह लोकमान्यनगरवासियांनी सरकारचा केला...

राज्य जीएसटी अधिकाऱ्यांचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन.

पुणे- राज्य जीएसटी अधिकाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून आपल्या...

“ज्या स्त्रीच्या वेदनेवरून कायदे बदलले, तिला समाजाने न्याय दिलाच पाहिजे” — डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर, दि. ११ डिसेंबर २०२५ :चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे...