पुणे-मकरसंक्रांतनिमित्त समाजातील दुर्लक्षित घटकासाठी अनाम प्रेम परिवारातर्फे पुण्यातील रिक्षाचालकांसाठी तिळगुळ कार्यक्रम व गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये २०० रिक्षा चालकांनी व हमालांनी सहभाग घेतला . पुणे स्टेशनयेथील प्रवेशद्वारावर झालेल्या या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक अरुण कांबळे ,अनाम प्रेम परिवाराचे अनिल मोरे , पुणे रिक्षा फेडरेशनचे खजिनदार बापू भावे , फेडरेशनचे उपाध्यक्ष सुरेश जगताप , अशोक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे आयोजन अनाम प्रेम परिवारातर्फे अमर काळे , भाविका काळे , दीपक जोशी ,भक्ती पाठक , प्रणव पाठक , सुरेश काळे , अनिल मोरे आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी रिक्षाचालक व हमाल बांधवाना मकरसंक्रांतचे भेट कार्ड व तिळगुळ देउन शुभेच्छा देण्यात आल्या .
या कार्यक्रमामध्ये रिक्षामध्ये राहिलेली कागदपत्रे , पर्स , बॅग , मोबाइल प्रामाणिकपणे परत करणाऱ्या रिक्षा चालकांचा सन्मानचिन्ह देउन सन्मान करण्यात आला .

