पुणे- कॅम्प मधील ताबूत स्ट्रीटवरील हुसेनी बेकरीजवळील ताबूत स्ट्रीट यंग स्टार्स ग्रुपच्यावतीने अनाथ मुलांसाठी स्नेहभोजन व भेटवस्तू वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे आयोजन ताबूत स्ट्रीट यंग स्टार्स ग्रुपचे अध्यक्ष जेम्स आर्लेन यांनी केले होते . या कार्यक्रमामध्ये वाघोली मधील मरीया शरन सामाजिक संस्थेमधील अनाथ मुलांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला , त्यानंतर मुलांनी संगीत खुर्ची , नृत्य , फुगे फोडण्याच्या स्पर्धा संपन्न झाल्या . त्यानंतर मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या .
या कर्यक्रमाचे संयोजन ताबूत स्ट्रीट यंग स्टार्स ग्रुपचे अध्यक्ष जेम्स आर्लेन , जॅक्सन पिंटो , शकीला शेख ,एडविन अर्नाल्ड ,दास आर्लेन , गॉडफ्रे आर्लेन , अहमद शेख , फैय्याज शेख , हैदर रायटर , हुसेन रायटर, मॅथ्यू आर्लेन ,शाहनवाज शेख , आदींनी केले होते . यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नगरसेविका प्रियांका श्रीगिरी , माजी नगरसेवक उद्यकांत आंदेकर , मरीया शरन सामाजिक संस्थेच्या सिस्टर रिटा डिसोझा , सिस्टर फुलमनी अका , सिस्टर मारिया , सिस्टर सेलस सिस्टर अलका आदी उपस्थित होते .