पुणे-क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाचा ६० वा वर्धापनदिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून उत्साहात साजरा करण्यात आला . बुधवार पेठमधील सावतामाळी भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष रवी चौधरी , माजी आमदार कमल ढोलेपाटील ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा लडकत ,उपाध्यक्षा शशिकला ढोलेपाटील , मंगल जगताप , अनुप्रिता कलावंत , सचिव निलिमा कलावंत , सहसचिव प्रतिभा काटे , नूतन बनकर , नगरसेविका मनिषा लडकत , अनिता डोमाळे आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमामध्ये उषा भगत याना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . तर श्रध्दा राजेंद्र गायकवाड यांनी चार मुलींचे पालकत्व स्वीकारल्यामुळे त्यांचा शाल , श्रीफळ व पुष्पगुछ देउन सन्मान करण्यात आला . तसेच स्वयं उद्योजिका असलेल्या भारती अंकेलेल्लू यांचा शाल , श्रीफळ व पुष्पगुछ देउन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्तविक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा लडकत यांनी केले तर सूत्रसंचालन उषा भगत यांनी केले तर आभार प्रतिभा काटे यांनी मानले .
या कार्यक्रमास रुक्मिणी ढोले , सत्यभामा लडकत , वत्सला वायकर , रजनी घोलप , रेखा घुले , साधना लोखंडे , उमा शिंदे , सिंधू भूमकर , वत्सला पांढरे , वंदना थेऊरकर , उज्वला कांडपिळे , मालती अनाप क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या महिला सदस्या उपस्थित होते .