पुणे-राष्ट्रीय छात्र सेना पुणे मुख्यालयाच्यावतीने सेंट व्हिन्सेंट शाळेमधील विद्यार्थी अमिन झाकीर कुरेशी यांना विशेष नैपुण्य व प्रामाणिकपणाबद्दल ” बेस्ट कॅडेटस ” ने सन्मानित करण्यात आले . राष्ट्रीय छात्र सेना पुणे मुख्यालयाचे ग्रुप कमांडर ब्रिगेडीयर सुनिल बोधे यांच्याहस्ते प्रमाणपत्र देउन सन्मानित करण्यात आले .
सेनापती बापट रोडवरील सिम्बायोसीसजवळील राष्ट्रीय छात्र सेना पुणे मुख्यालयात हा सन्मान सोहळा पार पडला . अमिन झाकीर कुरेशी हा सेंट व्हिन्सेंट शाळेमध्ये नववीमध्ये शिकत आहे . त्याला खेळाची देखील आवड असून तो फुटबॉल खेळाडू देखील आहे . अमिनला देशसेवेसाठी काम करायचे असून त्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आय. ए. एस. ऑफिसर्स म्हणून काम करायचे आहे .
अमिन झाकीर कुरेशी यांना सेंट व्हिन्सेंट शाळेचे प्रिन्सिपल फादर पाटेकर व राष्ट्रीय छात्र सेनाचे अधिकारी व ट व्हिन्सेंट शाळेचे क्रीडा शिक्षक अविनाश देवणे आदी मान्यवर उपस्थित होते . सामाजिक कार्यकर्ते झाकीर कुरेशी यांचा तो मुलगा आहे .
मला गर्व आहे कि मला आज ” बेस्ट कॅडेटस ” ने सन्मानित करण्यात आले . हे सर्व आई वडिल व शिक्षकांचे श्रेय आहे . पुढे एन. सी सी. साठी काम करणार आहे .भारत देशाच्या विकासासाठी आपण कार्य करणार असल्याचे अमिन झाकीर कुरेशी यांनी सांगितले .

