पुणे-
नाना पेठमधील क्वार्टर गेट चौकातील मातृसेवा हॉस्पिटल व वूमेन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हाडांची ठिसूळता तपासणी शिबीर संपन्न झाले . या शिबिराचे उदघाटन पुणे शहराच्या महापौर मुक्ता टिळक यांच्याहस्ते दीपप्रज्वलित करून करण्यात आले . यावेळी महापौर मुक्ता टिळक यांची तपासणी करण्यात आली . या शिबिराचे आयोजन डॉ. यशराज शहा , डॉ. किशोर शहा , डॉ. स्वाती शहा , डॉ. स्नेहा शहा व वूमेन्स फोरमच्या अध्यक्षा हेमांगिनी शहा यांनी केले होते . या शिबीरात २०० जणांची मोफत हाडांची ठिसूळता तपासणी करण्यात आली .
यावेळी डॉ. यशराज शहा यांनी सांगितले कि , हाडांची ठिसूळता तपासणीमध्ये आपल्या शरीरामधील हाडांची मजबूत किती आहे ते समजते , तसेच , हाडांमधील कॅलिशमचे प्रमाण समजते . भारतीयांच्या जीवनशैलीप्रमाणे हाडांमध्ये कॅलिशम व व्हिटॅमीन डीची कमी आढळते . त्यासाठी आहार , विहार व व्यायामाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले . यावेळी मोफत फिजियोथेरपी देखील करण्यात आली . फिजियोथेरपिस्ट तेजस्विनी वाळके यांनी मोफत फिजियोथेरपी केली . मोफत हाडांची ठिसूळता तपासणी मोहम्मद नैमुद्दीन व विद्याधर पडवळ यांनी केली .
यावेळी महापौर मुक्त टिळक यांनी सांगितले कि , मातृसेवा हॉस्पिटल व वूमेन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हाडांची ठिसूळता तपासणी शिबीर हा उपक्रम कौतुकास्पद आहे . आपला वैद्यकीय कौशल्य समाजासाठी देणे हे सामाजिक कार्यच आहे .

