पुणे-घोरपडी गावठाणातील तालीम चौकातील वेशीवरच्या मारुती मंदिराचा जीर्णोद्वार व कळशारोहन सोहळा पार पडला . आळंदीचे श्री. श्री. श्री. शंकर महाराज यांच्याहस्ते कळस बसविण्यात आला . यानिमित्ताने मंदिरात चार दिवस धार्मिक कार्यक्रम सुरु होते . कळस व मारुतीच्या प्रतिमेची पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली . होमहवन व घोरपडी गाव व नवजीवन महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला . शेवटच्या दिवशी आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला . देवस्थान पंच मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती कवडे यांनी आळंदीचे श्री. श्री. श्री. शंकर महाराज यांचा सत्कार केला .
कै. विठ्ठलराव गुलाबराव कवडे पाटील यांच्या स्मरणार्थ मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले . या मंदिराची पूजा पिढ्यान पिढ्या कवडे पाटील परिवाराकडे आहे . या कार्यक्रमासाठी गौरव कवडे पाटील , सुनील कवडे पाटील , संजय कवडे पाटील व घोरपडी गाव देवस्थान पंच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले .

