पुणे-
संविधानदिनानिमित्त दि मुस्लिम वेलफेर एज्यकेशन सोसायटीच्यावतीने पुणे लष्कर भागातील मराठी , उर्दू व इंग्रजी माध्यमांच्या अकरा शाळांमधील १५०० विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून संविधानाविषयी जनजागृती करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले . या प्रभात फेरीची सुरुवात लष्कर भागातील तय्यबिया अनाथ आश्रमपासून माजी आमदार मोहन जोशी यांच्याहस्ते ध्वज उंचावून करून करण्यात आली . यावेळी प्रभात फेरीचे संयोजक दि मुस्लिम वेलफेर एज्यकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद बियाबानी , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड , नगरसेवक दिलीप गिरमकर , नगरसेवक विनोद मथुरावाला ,लष्कर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संगीता यादव ,पोलीस निरीक्षक माया देंवरे , पोलिस पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी ज्योती परिहर , आझम कॅम्पसचे विश्वस्त अब्दुल वाहब शेख , दि मुस्लिम बँकेचे माजी संचालक शेख चाँद सरदार दिलीप भिकुले , सईद चौधरी , अक्रम शेख , असिफ शेख , भगवान गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजयी असो ….. , संविधान दिन चिरायू होवो ….. अशा विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या . हि रॅली भोपळे चौक , संत नामदेव चौक (कोहिनुर चौक ), महावीर चौक , महात्मा गांधी रोड , पंडित दीनदयाळ उपाध्यय चौक , अरोरा टॉवर्स यामार्गे काढण्यात आली . त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक संविधान वाचन केले . त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता झाली .

