पुणे – भारतीय जनता पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील महिला आघाडी अध्यक्षपदी लक्ष्मीताई बाळासाहेब घोडके यांची नियुक्ती करण्यात आली . या नियुक्तीचे पत्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याहस्ते देण्यात आले .
लक्ष्मीताई बाळासाहेब घोडके या पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आहेत , त्यांनी प्रभाग समिती अध्यक्ष , महिला बाल कल्याण समिती उपाध्यक्ष आदी पदावर काम केले असून मंगळवार पेठयेथील नरपतगीर चौकातील जय जगदंबा महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष आहेत .
वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात हे नियुक्ती पत्र देण्यात आले . यावेळी भाजप पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले , महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे ,खासदार अनिल शिरोळे , खासदार संजय काकडे , सभागृह नेते श्रीनाथ भिमाले , नगरसेवक सुनिल कांबळे , भारतीय जनता पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष जयप्रकाश पुरोहित , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष संतोष इंदूरकर आदी मान्यवर उपस्थित होते .