पुणे- बिबवेवाडी जवळील अप्पर सुपर येथे दलित पँथरच्या दोन शाखेच्या नामफलकाचे अनावरण दलित पँथर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले .
यावेळी दलित पँथर पुणे शहर अध्यक्ष प्रकाश साळवे , महिला अध्यक्ष सुनिता सूर्यवंशी , महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी आघाडी अध्यक्ष शुभम सोनवणे, पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल चव्हाण , आरती बाराथे , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण रणदिवे , पुणे शहर माथाडी कार्याध्यक्ष मछिंद्र पाटोळे , पुणे शहर माथाडी कामगार अध्यक्ष सूरज तुपे , सोमनाथ पाटोळे , गौतम शिंदे , विलास गायकवाड , हमिदा शेख, माया आल्हाट , रुबिना शेख , दलित पँथर अप्पर सुपर शाखा अध्यक्ष महेश वाल्हेकर , सोमनाथ पाटोळे , अजय वाल्हेकर , सागर नागटिळक , सूर्या कांबळे , सनी शेंडगे , सुधीर घोलप , ओंकार माने , सचिन आरखडे , रोहित वाल्हेकर , सौरभ म्हस्के , तेजस मिसाळ , आकाश लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी दलित पँथर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी सांगितले कि , सर्व जाती धर्मातील बांधवाना बरोबर घेउन दलित पँथर हि सामाजिक संघटना आजपर्यंत कार्यरत आहेत यापुढील देखील दलित पँथरच्या शाखांच्या माध्यमातून अन्याय अत्याचार विरोधात आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत राहणार , संघटनेच्या माध्यमातून युवकांसाठी रोजगार निर्मिती साठी देखील काम करणार आहे. महिलांच्या संरक्षणासाठी दलित पँथर काम करणार आहे .