पुणे-द मुस्लिम वेल्फअर एज्युकेशन सोसायटीच्यावतीने शिक्षक दिनानिमित पुणे शहरातील ४६ शाळांमधील शिक्षकांचा ” आदर्श शिक्षक पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात आले . भवानी पेठमधील टिम्बर मार्केटमधील सावित्रीबाई फुले स्मारकमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मोहन जोशी ,कार्यक्रमाचे संयोजक द मुस्लिम वेल्फअर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद बियाबानी , रुख्सार वाहिद बियाबानी , प्रमुख पाहुणे विधानपरिषदेचे आमदार अनंतराव गाडगीळ , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड , शिक्षण मंडळ माजी उपाध्यक्ष नुरुद्दीन सोमजी , नगरसेविका हमिदा अनिस सुंडके ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे , माजी नगरसेवक अय्युब शेख , प्रसिध्द फळांचे व्यापारी हाजी उस्मान शेख , बंधुभाव फाउंडेशनचे अध्यक्ष साबीर शेख व सीमा तुंगेकर मुबारक जमादार , मोहम्मद मुत्तलिब , अहमद बागवान , शोएब शेख , शहाबाज शहा आदी मान्यवर उपस्थित होते .
पुणे शहरातील मराठी , उर्दू व इंग्रजी शाळांमधील तसेच पुणे महापालिका शाळामधील शिक्षकांना माजी आमदार मोहन जोशी यांच्याहस्ते सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र , शाल व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले . तसेच , युसूफ नदीम सर शेख यांना मौलाना अबुल कलाम आझाद जीवन गौरव पुरस्कार , आणि लियाकत अली मोकाशी सर यांना महात्मा ज्योतिबा फुले जीवन गौरव पुरस्कार , आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग खेळाडू श्याम सहानी यांनी आशियायी पॉवरलिफ्टिंगमध्ये चार ब्राँझ पदके मिळविल्याबदल स्व. अली सोमजी पुणेरत्न पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले . तसेच , अंजुमन ए
इस्लाम पीर मोहम्मद गर्ल्स हायस्कुल यांना शाळेच्या दहावीचा १०० टक्के निकाल लावल्याबद्दल यांना उत्कृष्ट शाळेचा प्रथम पुरस्कार , तसेच अँग्लो उर्दू बॉयज हायस्कुल द्वितीय पुरस्कार आणि पुणे महापालिकेच्या हकीम आजमल खान उर्दू हायस्कूल यांना तृतीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये पुरस्काराथी शिक्षकामधून लकी ड्रा काढण्यात आला , त्यामध्ये कॅम्प एज्यकेशन मराठी प्रायमरी स्कुलच्या शिक्षिका सुप्रिया सुभाष फडके यांना सालाबादप्रमाणे सोन्याची अंगठी सौ. सीमा तुंगेकर यांच्या हस्ते देण्यात आली . यावेळी कैलास कुमार यांचा संगीत रजनीचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला .
या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक द मुस्लिम वेल्फअर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वाहिद बियाबानी यांनी केले तर सूत्रसंचालन उज्मा तस्नीम यांनी केले तर आभार रुकसार वाहिद शेख यांनी मानले .