पत्रकार दिनानिमित्त उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा पुरस्काराने सन्मान

Date:

पुणे-मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ हे बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. दिवस बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिनही आहे. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.या पत्रकार दिन सोहळ्यानिमित्त पुणे मीडिया वॉच व सिध्दार्थ वाचनालय व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारिता क्षेत्रांमधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते . हा कार्यक्रम सोमवार , ६ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ६ वाजता पुणे कॅम्प भागातील नवा मोदीखानाजवळील आझम कॅम्पसमधील असेम्ब्ली हॉलमध्ये  आयोजित करण्यात आला आहे . यंदा सोहळ्याचे १५ वे वर्ष आहे . अशी माहिती  पुणे मीडिया वॉचचे संचालक महेश जांभुळकर यांनी दिली .

यावेळी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण हे बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे त्यानंतर जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांचे ” राजकारणाचा नवा पॅटर्न आणि पत्रकारिता ” या विषयावर व्याख्यान होणार आहे . त्यानंतर पत्रकारिता क्षेत्रांमधील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे . यामध्ये ग्रामीण भागातील फलटण येथील रमेश आढाव , महिला पत्रकार प्रयागा होगे , उपनगर वार्ताहर दिगंबर माने , नामदेव ढसाळ पत्रकारिता पुरस्कार हा कोरेगाव भीमा येथील रामदास लोखंडे , बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार पुरस्कार अलोक निरंतर , सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय भवानी पेठमधील काशेवाडी येथील  धम्मपाल सेवा संघाचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाचनालय , सिटीजन जर्नालिस्ट रामदास सूर्यवंशी , इलेक्ट्रॉनिक मीडिया पुणे दर्पण न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी विजय जगताप ,गुन्हे वार्तांकनासाठी देवेंद्र जैन , वृत्तपत्र छायाचित्रकार मंदार टण्णू ,  वृत्तपत्रविक्रेता , जीवनगौरव , युवा पत्रकार आदींना स्मृतीचिन्ह , शाल व पुष्पगुछ  देऊन सन्मानित करण्यात येणार आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशभरातून 4636 ज्येष्ठ कलाकारांना दिले 26.09 कोटीचे निवृत्ती वेतन

नवी दिल्ली,- संस्कृती  मंत्रालयाच्या वतीने ज्येष्ठ कलाकारांसाठी आर्थिक सहाय्य योजना या...

खासदार मेधा कुलकर्णींविरोधात 153ए अंतर्गत कारवाई करा:गुलाबो गँगच्या संगीता तिवारींची पोलिसात तक्रार

पुणे-खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्यांमुळे शहरातील सामाजिक व धार्मिक...

सायबर सुरक्षेसाठी पुण्यात हवीत पाच नवीन पोलीस ठाणी–आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्याच्या गृह...