नामदेव ढसाळ यांच्या साहित्याने आंबेडकर चळवळीला आकार देण्याचे महत्वपूर्ण काम केले-आमदार भाई जगताप

Date:

पुणे-पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या  साहित्याने आंबेडकर चळवळीला आकार देण्याचे महत्वपूर्ण काम केले असल्याचे कामगार नेते व आमदार भाई जगताप यांनी व्यक्त केले . दलित पँथरच्यावतीने  पुणे कॅम्प भागातील नेहरू मेमोरियल हॉल मध्ये पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या पाचव्या स्मृती अभिवादन सभेत ते बोलत होते . या अभिवादन सभेस दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष यशवंत नडगम , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ घनश्याम भोसले , कार्याध्यक्ष अल्ताफ सय्यद ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष व नगरसेवक चेतन तुपे , नगरसेविका लता राजगुरु , दादासाहेब सोनवणे ,  सुरेश केदारे , बाळासाहेब पडवळ , अमित जावळे , भीमराव जाधव , सुनील शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते .

आमदार भाई जगताप यांनी सांगितले कि , पदमश्री नामदेव ढसाळ यांनी शोषित पिढीत व कामगार चळवळीसाठी मोठा सामाजिक लढा दिला . त्यांनी पँथर्सचा दरारा निर्माण केला होता . त्या माध्यमातून त्यांनी दलित , कामगार चळवळीला न्याय मिळवून देण्याचे काम केले . त्यांची कार्याची महती या समाजात टिकवून ठेवण्यासाठी आपण त्यांचे आंबवडे येथील स्मारक उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .

यावेळी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले कि , दलित पँथरची स्थापन नामदेव ढसाळ यांनी संघर्षातून झाली आहे . देशातल्या गोरगरीब , कष्टकरी जनता व दलित बांधवाना न्याय देण्याचे काम नामदेव ढसाळ यांनीदलित पँथरच्या चळवळीतून केले . समाजातील तळागाळातील माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क त्यांनी मिळवून दिला . त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण हा पँथर्सच्या भूमिकेतून काम करू लागला . त्यातुन समाजाला न्याय मिळवून देऊ लागला .

यावेळी दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष यशवंत नडगम यांनी सांगितले कि , पदमश्री नामदेव ढसाळ यांनी दलित पँथरच्या माध्यमातून समाजात समता प्रस्थापित करण्याचे काम केले . परंतु आताचे राज्यकर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेली घटना बदलायला निघाले आहेत , परंतु दलित पँथर हे कदापिही होऊ देणार नाही . दलित पँथर समाजातील लोकांना त्यांच्या हक्कांसाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढतच राहिल.

या कार्य्रक्रमात उपस्थितांचे स्वागत व अभिवादन सभेचे प्रास्ताविक  दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष यशवंत नडगम  यांनी केले तर सूत्रसंचालन विठ्ठल गायकवाड यांनी केले तर आभार दलित पँथरचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी मानले . 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्मिता हाईट्स रस्त्याच्या कामास प्रारंभ तर कॅनॉल रोड परिसरातील लेन नं. ३ मध्ये पाईपलाईन चे काम सुरु

पुणे- महापालिकेच्या प्रभाग क्र. ३०, कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी मधील...

भारतासह जगभरात इंटरनेटला होऊ शकतो धोका ?

युद्धामुळे होर्मुझमध्ये टाकलेल्या केबल्सना नुकसान होण्याची शक्यता; समुद्रात 97%...