पुणे-ख्रिश्चन लीगल असोसिएशन पुणेच्यावतीने वकील बांधवांचा आनंद मेळावा साजरा झाला . रास्ता पेठ मधील सिटी चर्चमध्ये झालेल्या या ख्रिसमस आनंद मेळाव्याचे आयोजन ऍड जॉन रॉड्रिक्स , पास्टर बरनवाज सुंदरराजन , ऍड संजय साळवी , ऍड के व्ही त्रिभुवन , ऍड सॅमसन अँड्रूज , ऍड प्रताप साबळे , ऍड एस एम देव , ऍड अनुपमा जोशी , डॉ मॅनवेल डिसोझा , ऍड फ्रान्सिस भोसले , ऍड अँथोनी बनसोडे, ऍड अँजीलिना कांबळे , ऍड मेरी जोसेफ , ऍड टी डी आयझॅक , ऍड एस एस काळे , ऍड संपत कांबळे , ऍड जॉन रिजारू , ऍड बाजीराव दळवी , ऍड बाळासाहेब चोकर , ऍड संगीता मेनजेस , ऍड मार्क परमार , ऍड अँथोन कदम , ऍड लुईस तिलोरे , ऍड स्टेला मेंडीस , ऍड आर जे डिसिल्वा , ऍड समीर मनतोडे , ऍड संगीता फर्नांडिस , ऍड विजयन भास्करन , ऍड ब्रिजेस मेंडिस , ऍड नॉवेल फर्नाडिस आदी ख्रिस्ती समाजातील वकील बांधव व राजेश नायर , निकी मार्टिन , अँथोनी मस्किटा, दीपक कदम, स्मिता नायडू , मॅथ्यू आर्लेंड आदी मान्यवर उपस्थित होते .
प्रत्येक चर्चमध्ये कायदेशीर सल्लागार या पदावर ख्रिस्ती वकिलाची नेमणूक झाली पाहिजे , तसेच चर्चच्या कायदेशीर अडचणी सोडविण्यासाठी , ख्रिश्चन लीगल असोसिएशन मदत करेल , ख्रिस्ती समाजबांधवांच्या कायदेशीर अडचणी सोडविण्यासाठी ख्रिश्चन लीगल असोसिएशन लीगल डेस्क सुरू करणार , सोशल मीडियाचा माध्यमातून ख्रिस्ती समाजातील वकील बांधवानी एकत्र आणले जाईल , तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अडचणी सोडविण्यासाठी वकिलांनी संपर्कात राहावे . आदी विषयांवर चर्चा करण्यात आली .
ख्रिश्चन लीगल असोसिएशन हे देशात कार्यरत राहणार ख्रिस्ती वकील बांधवांची संघटना असून १८ राज्यात ९१ शहरात एक हजार व्यावसायिक वकील बांधव ख्रिश्चन लीगल असोसिएशनचे सदस्य आहेत . अशी माहिती ऍड जॉन रॉड्रिक्स यांनी दिली .

