पुणे-अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने `विविध मागण्यासाठी पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर भव्य आंदोलन करण्यात आले . हे आंदोलन अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. पनीकर सुधाकर दास , संघटनेचे पुणे महापालिका युनियन अध्यक्ष सतीश लालबिगे यांच्या नेर्तृत्वाखाली करण्यात आले . या आंदोलनात संभाजी देशमुख , जयंत मोडक , अनिल भिंगारदिवे , बाबा गोणेवार , दीपक देवकुळे , सूर्यकांत यादव , अजित मापारे , अमित भारवासी , शोभा सूर्यवंशी , रत्ना काळे , तेजस्विनी सडेकर , नितीन डसूळ , संजय भोसले व मोठ्या संख्येने कामगार वर्ग सहभागी झाले होते .
यामध्ये पुणे महापालिकेमधील बहूउदेशीय पथकामधील कर्मचारी तसेच पुणे महापालिकेचे सफाई कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात व वरिष्ठ अधिकाऱ्याच्या होणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे उच्च न्यायालय – औद्योगिक न्यायालय तसेच महाराष्ट्र शासन यांच्याकडे दिलेल्या तक्रारीवरून कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचे २८ / १० / २०१४ रोजीचे उच्च न्यायालयाचे आदेश असूनदेखील आतापर्यंत आदेशाची अंमलबजावणी न करता माजी सैनिक कर्मचाऱ्यांनी वारंवार बदली करणे , कामाचे स्वरूप बदलणे अशी कामे करत असत .
त्यासाठी उच्च न्यायालयाचे २८ / १० / २०१४ च्या आदेशाची अंमलबजावणी करून माजी सैनिक कर्मचाऱ्यांना तातडीने कायमस्वरुपी करण्यात यावे . , माजी सैनिक नियम १९८४ कलम ४ नुसार आरक्षित केलेले १५ टक्के आरक्षण जागा भरण्यात याव्यात . , किमान वेतन कायद्यानुसार बहुउद्देशीय पथकातील कर्मचारी बांधवाना कामावर लागल्यापासून वेतनातील फरकाची रक्कम देण्यात यावी . , ज्या कामासाठी माजी सैनिकांच्या नेमणूक केल्या आहेत तेच काम देण्यात यावे . , दर महिन्याचे मासिक वेतन १ ते १० तारखेपर्यंत देण्यात यावे . ,बहुउद्देशीय पथकामधील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक केली जाते ती थांबवावी याबद्दल महाराष्ट्र शासनाचे माजी सैनिकांना सन्माननीय वागणूक देण्याबद्दल शासकीय परिपत्रक काढले आहे . , बहुउद्देशीय पथकामधील माजी सैनिक कर्मचारी याना भरती प्रक्रियेवेळी जो गणवेश दिला आहे त्यात बदल करू नये . , कर्मचारी कामावर आल्यापासून काम संपवून परत जाईपर्यंत त्यांचा अपघात किंवा आकस्मित दुर्देवी घटना घडल्यास त्याचा सर्व खर्च पुणे महानगरपालिकेने द्यावा . सफाई कामगार यांच्या वारसा हक्क व अनुकंपाची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावी , सफाई कर्मचाऱ्यांना राहण्याकरिता जागा उपलब्ध करून देणे , डॉ . बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेतून पंचवीस वर्ष सेवा झालेल्या सेवकांची आत शिथिल करून १५ वर्ष करण्यात यावी , शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार रिक्त पदाची भरती त्वरित सुरु करावी , रोजदारीत काम करत असलेल्या व ठेकेदारीत काम करत असलेल्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना त्वरित कामावर कायम करावे , पर्वती व लष्कर जलकेंद्र येथील घाणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घाणभत्ता लागू करावा , सफाई कर्मचाऱ्याचे प्रश्न वेळोवेळी सोडविण्यासाठी व समजून घेण्यासाठी संघटनेला भाडे तत्वाच्या करारावर ऑफिस देण्यात यावे , घाणीत काम करणाऱ्या सेवकांच्या हजेरी कोठीवर जाऊन दर तीन महिन्यांनी आरोग्य तपासणी करण्यात यावी , २७ /२/ २०११ रोजीच्या सफाई कर्मचाऱ्यांची भरती जाणूनबुजून रद्द केली आहे ती त्वरित चालू करावी , १३० एम. एल. डी. भैरोबा पम्पिंग स्टेशन कामगारांना न्याय द्यावा . या मागण्या पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार याना निवेदनाद्वारे देण्यात आल्या . आपल्या सर्व मागण्या ४८ तासाच्या आत सोडविण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले
या मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढे ” अर्ध नग्न आमरण उपोषण आंदोलन ” करण्याचा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे पुणे महापालिका युनियन अध्यक्ष सतीश लालबिगे यांनी दिला आहे .