पुणे-सोमवार पेठमधील नरपतगीर चौकात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्यावतीने ” मतदार नाव नोंदणी व दुरुस्ती अभियान” सुरू करण्यात आले. या अभियानाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेवक प्रदीप गायकवाड , राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे कॅंटोन्मेण्ट विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष विशाल नाटेकर , राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष फहिम शेख, अध्यक्ष भोलासिंग अरोरा , राहुल तांबे, विशाल मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . या अभियानाचे आयोजन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुणे कॅंटोन्मेण्ट विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष विशाल नाटेकर यांनी केले होते .या अभियानासाठी ललिता जगदाळे , सुषमा आंग्रे , गोपी कुरवर यांनी परिश्रम घेतले .
राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्यावतीने ” मतदार नाव नोंदणी व दुरुस्ती अभियान”
Date: