पुणे-भारतीय जनता पार्टी प्रभाग १९ मधील रहिवाश्याना प्रधानमंत्री उज्जला प्लस योजनेअंतर्गत मोफत गॅस कनेक्शनचे वाटप भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे , भारतीय जनता पार्टी प्रभाग १९ मधील नगरसेविका मनिषा संदीप लडकत , नगरसेविका अर्चना पाटील , नगरसेविका आरती कोंढरे , नगरसेवक आरती कोंढरे , माजी नगरसेवक संदीप लडकत , जयप्रकाश पुरोहित , सांची किशोर सिंगवी आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी भारतीय जनता पार्टीने केंद्रात सुरु केलेल्या विविध योजनांची माहिती दिली . तसेच शहरातील विकास कामाची माहिती दिली . यावेळी गॅस कनेक्शन मिळालेल्या जनतेशी सवांद साधला .
यावेळी नगरसेविका मनिषा संदीप लडकत यांनी सांगितले कि , प्रभागात जास्तीत जास्त गॅस कनेक्शन देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत . १५१ गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले . प्रभागाचा सर्वागीण विकास करणार असल्याचे सांगितले .