पुणे-श्रावणमासानिमित्त राजस्थानमधील गोगामेडीस दर्शनासाठी पुणे लष्कर भागातील गोगाभक्तांची यात्रा संपन्न झाली . या यात्रेमध्ये लष्करमधील मोदीखाना येथील अशोक संघेलिया भगत निशाण , मंगळवार पेठमधील कैलास चव्हाण भगत निशाण , भवानी पेठमधील कालू तान्द्रे भगत निशाण , ससून कर्मचारी वसाहत येथील भोला चव्हाण भगत निशाण , मुंढवा येथील भीम जेधे भगत निशाण असे पाच निशाण सहभागी झाले होते .
राजस्थान येथे गोगामेडी येथे देशभरातून दहा हजार निशाण सहभागी झाले होते . भारतात मेहतर वाल्मिकी समाज भगवान गोगादेवाला दैवत मानतात. या या कविराज संघेलिया , भगत अशोक संघेलिया , बंडू चरण , मेघराज पवार, सतीश सारवान , मनोज जेधे , मिथिलेश कागडे , विक्रम गोहेर , संजय वाघेला ,नोंनु चौहान , सुनील चौहान , प्रकाश सोलंकी , प्रविण सोलंकी , राजेश राजपूत , अरविंद चव्हान , सुजित अठवालं, अक्षय मंचरकर , विशाल सोलंकी , योगेश चव्हान , चंदन मारू , विक्की सुसगोहेर , प्यारेलाल सायसर , शारदा वाघेला , सावित्री सुसगोहेर , शंकुतला सुसगोहेर , प्रेमबाई सोलंकी , मिना सुसगोहेर , अनिता बिडलान , अंजु बेगी , विद्या चव्हाण , विद्या गोहेर , रमन मकवानी व संकेत सोलंकी आदी गोगाभक्त सहभागी झाले होते .


