पुणे-” कारागिरी ” या विणलेल्या कपड्यांचे नूतन दालनाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या पत्नी सौ अमृता फडणवीस यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले . कोरेगाव पार्कमधील गल्ली क्र ५ अर्थविश्व या इमारतीमध्ये ” कारागिरी ” या विणलेल्या कपड्यांचे नूतन दालन सुरु करण्यात आले . यावेळी ” कारागिरी ” च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी मोहाडीकर , डॉ. अमोल पटवारी , डॉ. संग्राम पटवारी , अशोक मोहाडीकर , मिलिंद गायकवाड , नगरसेवक उमेश गायकवाड , सांगलीच्या नगरसेविका स्वरदा केळकर बापट , शिपिंग कर्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रदीप रावत , योगेश पिंगळे , नागनाथ निरवदे व शिशिर देसाई आदी मान्यवर उपस्थित होते .
दालनाच्या उदघाटनानंतर सौ अमृता फडणवीस यांनी सांगितले कि , विणकाम हा पारंपरिक कला आहे . ती जपण्यासाठी आपण विणकाम करणाऱ्याना प्रोत्साहन देण्यासाठी आपण प्रयत्न करू . हा व्यवसाय वृध्दिसाठी जी मदत लागेल ती आपण सर्वोपतरी करू . ” कारागिरी ” या विणलेल्या कपड्यांचे नूतन दालनामध्ये विणलेल्या साड्या खूप छान आहेत . ग्राहकांना ” कारागिरी ” मधील असलेले कपडे पसंत करतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला .
यावेळी ” कारागिरी ” च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी मोहाडीकर यांनी सांगितले कि , विणकाम करणाऱ्याकडून ग्राहकापर्यंत कपडे विक्री करण्याचे काम कारागिरी मधून होत असते . त्यासाठी कपड्यांची गुणवत्ता व दर ” कारागिरी ” मध्ये योग्य त्या दारात उपलब्ध करून दिले जाते . ” कारागिरी ” मधून ११ देशामध्ये मालाची निर्यात केली जाते . त्यामध्ये प्रामुख्याने अमेरिका , दुबई , सिंगापूर , मलेशिया , नेटरलँड्स व इनलॅंड्स या देशामध्ये ” कारागिरी ” या विणलेल्या कपड्यांना मोठी मागणी असते . यामध्ये साड्यामध्ये पैठणी , कांजीवरम , बनारसी , कलमकारी , लिनन , पटोला , साऊथ सिल्क , म्हैसूर सिल्क , हॅन्डब्लॉक प्रिंटेड अशा २५ प्रकारच्या साडया ग्राहकांना उपलब्ध आहेस . विणलेल्या साड्या २० वर्षापर्यंत टिकते . तशीच हाताने विणलेली असल्याने सर्व ऋतूमध्ये वापरता येते . तसेच कुर्ती सुध्दा उपलब्ध आहेत .