पुणे- शहर महिला काँग्रेस कमिटी व रेणुका महिला बचत गटाच्यावतीने रक्षाबंधनचा कार्यक्रम पोलीस बांधवाना राख्या बांधून साजरा करण्यात आला . पुणे स्टेशनजवळील बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या आवारात महिलांनी पोलिसांना राख्या बांधल्या . यावेळी गोड मिठाई पोलीस बांधवाना देण्यात आली . या कार्यक्रमास नगरसेविका लता राजगुरू , नगरसेविका चांदबी नदाफ , पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनाली मारणे , उपाध्यक्षा छाया जाधव , पुणे स्टेशन ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मीरा शिंदे , पूनम बोराटे , रजिया बल्लारी , विजया क्षीरसागर , बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार घाग , महिला पोलीस हवालदार रोहिणी भोकसे , ज्योती अरबेन , ललिता जगताप , सारिखा मुंडावरे आदी मान्यवर उपस्थित होते .
प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबियांसमवेत सण घरी साजरा करत असते , परंतु पोलीस मात्र आपले रक्षण करण्यासाठी आपली ड्युटी निंभावत असतो . त्यांच्या संरक्षणामुळे आपण सुरक्षित आहोत . यामुळे आज महिलांनी पोलिसांना राख्या बांधल्या . रक्षाबंधन सण साजरा केला असे नगरसेविका लता राजगुरू यांनी सांगितले .