पुणे-संविधानाची विटंबना करणाऱ्या देशद्रोहींना फाशी द्या हे मागणी घेवून दलित पँथर ऑफ इंडियाच्यावतीने राज्यव्यापी ” संविधान जनक्रांती आंदोलन ” पुणे स्टेशन जवळील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दलित पँथर ऑफ इंडियाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब भोसले यांच्या नेर्तृत्वाखाली ” संविधान जनक्रांती आंदोलन ” सुरु करण्यात आले . यावेळी संविधानाची व राष्ट्रनिष्ठेची शपथ घेत संविधानाचे प्रियाबलचे वाचन करण्यात आले . यावेळी निवासी उपजिल्हाअधिकारी यांना निवेदन देण्यात आले .
भारतीय संविधान प्रजातंत्र धर्मग्रंथ लोकशाहीकृत भारताचा आत्मा आहे . भारतीय राज्य घटना तथा संविधान नवी दिल्ली येथे देशद्रोही समाजकंटकांनी विटंबना करत जाळले . संविधानाची विटंबना करत जाळणे म्हणजे देशाचा अपमान आहे . संविधान जाळणारे गुन्हेगार मोकाट आहेत त्यांना अजून अटक नाही . देशाचे संविधान सुरक्षित नाही तर सामान्य जनतेचे काय ? असा सवाल दलित पँथर ऑफ इंडियाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब भोसले यांनी उपस्थित केला . देशातील कायदा सुव्यवस्था कोलमडली आहे . हा गंभीर विषय आहे . संविधानाची विटंबना करणाऱ्या आरोपीना त्वरित फाशी द्या .,भारतीय संविधानासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्याची वेळ आली आहे . जर शासन ते करणार नसेल तर जनता आपल्या पध्दतीने संविधानाचे रक्षण करेल . ” संविधान जनक्रांती आंदोलन ” सर्व राज्यात होणार असून दिनांक १३ सप्टेंबर २०१८ रोजी जंतर मंतर येथे याची सांगता होणार आहे , असे दलित पँथर ऑफ इंडियाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब भोसले यांनी सांगितले .
या आंदोलनात दलित पँथर ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा अध्यक्ष संघराज गायकवाड , पुणे शहर अध्यक्ष महादेव गायकवाड , पुणे शहर महिला आघाडी अध्यक्षा द्रौपदी पाटील , सरचिटणीस वंदना दरपेल्ली , युवा आघाडी पुणे शहर अध्यक्ष राहुल भोसले , दौंड तालुका अध्यक्ष पिंकू झेंडे , मुळशी तालुका अध्यक्ष विजय कांबळे , युवा आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष मंगेश जगताप , गजेंद्र चांदणे , सचिन पवार , जितू गायकवाड , आकाश घोडके , गौतम चौधरी, दीपक जाधव , राजू संपकाळ , सचिन सुरवसे , प्रसन्न कांबळे , प्रसन्नजीत चांदणे , स्वप्नील गायकवाड , ओंकार कांबळे , इलियास शेख , रोहित भोंडे , सिध्दार्थ कांबळे , प्रा. डी. के. साखरे , दलितमित्र भगवान जाधव आदी मान्यवर मान्यवर व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते .


