पुणे-वडगाव शेरी येथील सत्यम सेरेनेटीजवळ स्व. प्रविण द्वारकाप्रसाद बन्सल यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार जगदीश तुकाराम मुळीक , वीरांगना फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुमन बाबर पाटील , नगरसेवक संदीप गराड , नगरसेविका सुनीता गलांडे , नगरसेविका शीतल ज्ञानेश्वर शिंदे , माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे , लायन्स क्लब पुणे अग्रसेन अध्यक्ष राजेश सुरेंद्र अग्रवाल, सत्यम ग्रुपचे अध्यक्ष द्वारकाप्रसाद बन्सल , सत्यम सेरेनेटी सोसायटीचे अध्यक्ष व लायन्स क्लब पुणे अग्रसेनचे सचिव राजेश द्वारकाप्रसाद बन्सल , कोकण रहिवाशी संघ वडगाव शेरी अध्यक्ष दीपक यरपली , सत्यम सेरेनेटी सोसायटीचे सर्व सभासद , सत्यम ग्रुपचे सदस्य व बन्सल परिवार आदी मान्यवर उपस्थित होते .
बदाम , मोघनी , ऍस्टोनिया , जांभूळ , पाम आदी जातींचे वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले . जेष्ठ नागरिकांचा एक वृक्ष , श्रीफळ , पुष्पगुछ देऊन सन्मान करण्यात आला .
पर्यावरण जनजागृती करून परिसर स्वछ ठेवण्यासाठी या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . जसे जेष्ठ नागरिकांचा आधार प्रत्येक कुटुंबीयास असतो तसेच , पर्यावरण स्वछ ठेवून आपणास ऑक्सिजन देण्याचे काम वृक्ष करतात व आपणास आधार देतात. अशी माहिती कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सत्यम सेरेनेटी सोसायटीचे अध्यक्ष व लायन्स क्लब पुणे अग्रसेनचे सचिव राजेश द्वारकाप्रसाद बन्सल यांनी दिली .


