पुणे- रक्षाबंधनानिमित्त पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन दलातील कर्मचारी बांधवाना पुणे लष्कर भागातील महिलांनी राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले .या कार्यक्रमाचे आयोजन राजाभाऊ चव्हाण व विशाल मोरे यांनी केले होते .
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून रुपाली चाकणकर , अर्चना हनमघर , मीना पवार , रंजना सोनवणे ,छाया जाधव , अंजली परेरा , निता गलांडे , राजश्री कसबेकर , मीना गायकवाड , दीप्ती खुंटे , कामिनी थोरात , उषा घोगरे , सीमा वाघमारे आदी महिला उपस्थित होत्या . तसेच विशेष उपस्थितीमध्ये भोलासिंग अरोरा , रुपेश डाके , रणजित परदेशी , विकास भांबुरे , मुस्ताक पटेल , मोहन नारायणे ,अझीम गुडाकूवाला , राजू नायडू , विजय भोसले , महेंद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी रुपाली चाकणकर यांनी सांगितले कि , आपला जीव धोक्यात घालून अग्निशमन कर्मचारी आग विझविण्याचे महत्वपूर्ण काम करत असतो . वेळ प्रसंगी जीव गमवावा लागला तरी ते अनेकांचे प्राण वाचवितात . अशा कर्मचारी बांधवाना राखी बांधून आम्ही बहिणींनी संकटाना सामना करण्यासाठी शक्ती दिली असून त्यामुळे आमचे कर्तव्य म्हणून आम्ही महिला आज रक्षाबंधन साजरा करीत आहोत .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रम जाधव , यश कांबळे , विनायक राठोड , कुणाल पुंजानी , योगेश होळकर ,आदित्य यादव , शिवशरण कांबळे , आकाश चव्हाण , प्रणव ठक्कर आदींनी विशेष परिश्रम घेतले .
यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश हसबे , विकास खराडे , शम्मी कसोटे , असिफ शेख , कुंडलिक गायकवाड , दिनेश शिंदे , मयूर सावंत , महेश जगताप , अशफाक शेख आदी अग्निशमन कर्मचारी उपस्थित होते .

