पुणे-बांग्लादेश येथील ढाका या शहरात साऊथ एशियाई मार्शल आर्टस् स्पर्धेत आठ देशातील १८० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता . त्यामध्ये भारतीय संघाने पुणे येथील श्वेता भोसले ( १ सुवर्ण ,२ रौप्य ), हर्षल गरड (१ कांस्य ) या खेळाडूंनी पदके मिळवून संबंध एशियाई स्पर्धेत आपल्या देशाला दुसरा क्रमांक मिळवून दिला .
या खेळाडूंचे भारतीय संघाचे प्रशिक्षक शंकर महाबळे यांचे मार्गदर्शन लाभले . याबद्दल वोविनाम महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विष्णू साहाय , राष्ट्रीय सचिव प्रविण गर्ग ,भारती विद्यापीठाचे कार्यवाह व कडेगाव पलूसचे आमदार डॉ. विश्वजित कदम , बंडूअण्णा आंदेकर , नगरसेवक वनराज आंदेकर , भवानी पेठ वॉर्ड अध्यक्ष सुनिल घाडगे आणि फिटनेस मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्स अकॅडमी यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले .
श्वेता भोसले हे आबेदा इनामदार महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे . फिटनेस मार्शल आर्ट्स अँड स्पोर्ट्स अकॅडमीची तीन संचालिका आहे . गेली पाच वर्षांपासून मार्शल आर्ट्समध्ये प्रशिक्षण घेत आहे . श्वेताने वोविनाम या खेळात राज्यपातळीवर व जिल्हा पातळीवर एक सुवर्ण पदक जिंकले आहे . तिला क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे आहे . मुलींनी स्वसंरक्षणासाठी हा खेळात सहभाग घेतला पाहिजे . घरच्यांच्या पाठिंब्याने आपण हे यश मिळविले आहे . अंत्यत प्रतिकूल परिस्थितीत तिने हे यश मिळविले आहे . असे श्वेता भोसले हिने सांगितले .


