पुणे-भारतीय दलित कोब्रा या सामाजिक संघटनेच्यावतीने विविध मागण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला . मोर्चाची सुरुवात पुणे स्टेशन समोरील महात्मा गांधी पूर्णाकृती पुतळ्यापासून करण्यात आली . भारतीय दलित कोब्रा या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष ऍड. भाई विवेक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला .
यावेळी पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले . यावेळी शासकीय अध्यादेश पाहून आपल्या मागण्या पूर्ण करू असे आश्वासन मोर्चाच्या शिष्टमंडळाला दिले . या मोर्चामध्ये गोविंद गायकवाड , रामदास पवार , सुरेश जाधव , शंकर पवार , शिवाजी गायकवाड , भाऊसाहेब चवधरी , शांताराम पवार , प्रकाश पवार , रामदास पवार , रामभाऊ गायकवाड , प्रताप पवार , संपत पवार , रामा पवार , सुदाम निंबाळकर , सचिन भालेराव , लता देठे , शांता काळे , अजय शिंदे , मेहबूब शेख आदी पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते .
यावेळी ऍड. भाई विवेक चव्हाण यांनी सांगितले कि ,पुण्यातील ग्रामीण भागात वर्षानुवर्षे ३० वर्षापेक्षा अधिक काळ भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांनी गायरान , इतर सरकारी विभागाच्या जागांवर निवाऱ्यासाठी छोटी झोपडी बांधतात . शासन नियमाप्रमाणे त्यांच्या घरांना निवासाची कायदेशीर मान्यता मिळाली पाहिजे . त्यांना या मान्यतेनंतर शासकीय योजनांचा लाभ घेता येईल . या झोपडपट्टी वासियांना त्यांच्या नावावर मालकी पट्टे करून द्यावीत . भटक्या विमुक्त समाज सतत डोक्यावर संसार घेऊन पोट भरण्यासाठी गावोगावी फिरत असतो . रस्त्याच्या कडेला नाल्याच्या कडेला , डोंगरावर माळरानावर तात्पुरता निवारा करत जगत असतो .परंतु , स्थानिक नागरिक त्यांना मारहाण करत असतात . अशाच घटनेत नागपंथीय डवरी गोसावी समाजाच्या पाच जणांचा मृत्यू झाला . राज्यात व पुणे जिल्ह्यात अशा शकेडो घटना घडत असतात तरी या लोकांना पूर्ण पणे जिल्ह्यात संरक्षण देण्यात यावे . भटक्या विमुक्त जाती जमातीचे लोक उदारनिर्वाहासाठी सतत भटकत असतात . त्यामुळे शासनाच्या सहकार्यामुळे शिकण्यास सुरुवात झाली आहे . दौंड , बारामती व पुरंदर या तालुक्यात शासन दरबार भरवून त्या जातीचा दाखला देण्याचे आदेश द्यावेत . दौंड तालुक्यातील वरवंड , दापोडी , केडगाव लिंगमाळ , बाटी आदी पट्टघाम नंदीवाले , मरीआई देववाले आदी लोक शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने शासकीय योजनेपासून वंचित आहे . अशा मागण्या निवेदनात देण्यात आल्या .

