लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
पुणे-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दलित पँथर महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने स्वारगेटजवळील सारसबाग येथील त्यांच्या दलित पँथर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .
यावेळी दलित पँथरचे पुणे शहर अध्यक्ष गणेश नायडू ,मुदस्सर शेख , अजय वंडगल , किरण ठोगे , पृथ्वीराज भिसे , अप्पा थोरात , पप्पू पाटील , लाल ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते .
महाराष्ट्र जोशी समाज संघटनेच्यावतीने सारसबाग येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष कैलास हेंद्रे यांच्याहस्ते अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .
यावेळी निलेश निकम , हरिकांत सरवदे , मारुती हंबुरे , भास्कर शिंदे , सुनीता सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताडीवाला रोड विभागच्यावतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
दलित महासंघाच्यावतीने दलित महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आनंद वैराट यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .यावेळी सुभाष शेंडगे , सारिका नेटके , सुहास नाईक , ऍड. यशवंत जाधव , प्रा. राजेंद्र भोईवार , प्रभाकर गवळी , सहदेव खंडागळे , नितीन चंदनशिवे , खंडूजी पवार , लक्ष्मी पवार , किरण ढावरे आदी मान्यवर उपस्थित होते .
विलास चौरे समाज सेवा प्रतिष्ठानच्यावतीने स्वारगेटजवळील सारसबाग येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विलास चौरे समाज सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब चौरे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .यावेळी सतीश मदने , नरेश जगताप , रोहित जगताप , बबलू घुगे , विजय तलभंडारे , सचिन जगताप , सदा देवनार , भूषण घोंगडे , श्रीकांत शेंडगे , प्रकाश साळवे , चंद्रकांत सकट , गोरख दुपारगुडे , बाबा कांबळे , सुभाष मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते .
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा स्वारगेटजवळील सारसबाग येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा पुणे शहर अध्यक्ष डॉ. भरत वैरागे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .यावेळी दिलीप घोकसे , सचिन बचुटे , संजय भिसे , सागर भोकसे , सागर भोकसे , प्रसन्न वैरागे आदी मान्यवर उपस्थित होते .
दलित युवा संघर्ष समिती पुणे शहराच्यावतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुधीर नेटके यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .यावेळी दलित युवा संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रमेश गायकवाड , विकास सातारकर , अश्रू खवळे ,सुहास बनसोडे , अनिल हातागळे , चाणक्य नेटके , सखुबाई सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते .