स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

Date:

पुणे-स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण  केले  . या उपोषणात राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुहास उभे व स्पर्धा परिक्षा सेलचे पुणे शहर अध्यक्ष विक्रम मधुकर गायकवाड यांच्या नेतुत्वाखाली करण्यात आले . यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी उपोषण  स्थळी भेट देउन मागण्याचे निवेदन स्वीकारले . या सदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले कि , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार व  विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे   स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत पावसाळी अधिवेशनात सरकारकडे मागण्या मांडतील व त्यांना न्याय देतील .

     या आंदोलनात महापालिका विरोधी पक्षनेते चेतन तुपे , माजी आमदार कमल ढोलेपाटील ,जालिंदर कामठे , शहर महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर , नगरसेवक प्रदीप गायकवाड , माजी नगरसेवक रविंद्र माळवदकर , शहर युवा अध्यक्ष राकेश कामठे , प्रदेश विद्यार्थी उपाध्यक्ष  सुजित जगताप , भोलासिंग अरोरा , युवती अध्यक्ष मनाली भिलारे , किशोर कांबळे , अजिंक्य पालकर , सुजित जगताप , संजय कामठे , निलेश जाधव , नितीन रोकडे , विद्यार्थी पुणे शहर अध्यक्ष ऋषी परदेशी आदी मान्यवर सहभागी झाले होते . यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी देशमुख यांना निवेदन देण्यात आले .

     या निवेदनामध्ये  रिक्त जागा भरण्यात याव्यात , सेवा निवृत्तीचे वय ५५ करण्यात यावे , कंत्राट पद्धतीने नोकर भरती करण्यात येऊ नये , राज्य सेवेच्या २०१८ च्या जाहिरातीमध्ये पदसंख्येत वाढ करण्यात यावी , संयुक्त परीक्षा गट ब च्या जाहिरातीमध्ये पदसंख्येत वाढ करण्यात यावी , तलाठी पदाची जाहिरात प्रसिध्द करून त्याची परीक्षा mpsc  द्वारे घेण्यात यावी , महापरिक्षा पोर्टल बंद करून त्या सर्व परीक्षा mpsc  द्वारे घेण्यात याव्यात , परीक्षा केंद्रावरती मोबाइल जॅमर बसविण्यात यावेत , सर्व परीक्षा या सी सी टी व्ही नियंत्रण कक्षेत आणावेत , राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्वतंत्र मुख्यालयाच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी , प्रतीक्षा यादी लावून उमेदवार निवड यादीत नाव येऊन पद स्वीकारत नाही . ते पद रिक्त न ठेवता प्रतीक्षा यादीतील उमेदवाराला ती जागा द्यावी . यामुळे अनुशेष रिक्त राहणार नाही , पोलीस उपनिरीक्षक २०१६ व २०१७ चा प्रलंबित निकालाबाबत  राज्य शासनाने भूमिका घ्यावी , mpsc ने ४५ दिवसाच्या आत निकाल लावावेत . अशा मागण्या मांडण्यात आल्या .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे शहराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदर विमानतळ विकास कामांचा आढावा मुंबई, दि....

‘ओव्या आजीच्या’, ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : सुलभा रारावीकर लिखित ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ आणि...

संगीतातून ईश्वर दर्शन-पद्म विभूषण उस्ताद अमजद अली खान यांचे विचार

एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे  प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा, खासदार ज्योथिमणी...

भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल असे रशियाला वाटत नाही:ट्रंपवर विश्वास नाही

ट्रम्प यांचा दावा- भारत रशियन तेल खरेदी करणे थांबवेल मॉस्को-रशियाने...