पुणे-प्लास्टिकला पर्याय म्हणून पुणे कॅम्प भागातील महिला बचत गटातील महिलांनी कागदी व कापडी पिशव्या तयार करत आहेत . पुणे कॅम्प भागातील ताबूत स्ट्रीटवरील पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय कौशल्य केंद्रात या पिशव्या तयार करण्यात येत आहेत .
याबाबत पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियांका श्रीगिरी यांनी सांगितले कि , शासनाने प्लास्टिक बंदी निर्णय घेतल्यानंतर पंडित दीनदयाळ उपाध्याय कौशल्य केंद्रात महिला बचत गटातील महिला स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन कागदी व कापडी पिशव्या तयार करीत आहेत . यामध्ये सुमारे १०० महिलांनी सहभागी होऊन दररोज पिशव्या टतयार करीत आहेत . या पिशव्या आम्ही पुणे कॅम्प भागातील व्यापारी बांधवाना काही पिशव्या मोफत देणार आहोत . त्यानंतर व्यापाऱ्यांना पिशव्या पसंत पडल्यानंतर आम्ही या पिशव्यां व्यापाऱ्यांना देणार आहोत . यामधून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करणार आहोत . महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहता महिला पुणे कॅम्प भागातील महात्मा गांधी रोडवर त्यांच्या मालासाठी विक्रीचे दालन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे आपण उभारणार आहोत . दररोज मोठ्या प्रमाणावर कागदी व कापडी पिशव्या तयार होत आहेत . प्लास्टिकला पर्याय म्हणून या पिशव्या उपयुक्त आहेत . महिला बचत गटांना अनुदान उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियांका श्रीगिरी यांनी सांगितले