पुणे-येथील भवानी पेठ हरकानगरमध्ये चार निशाणाची स्थापना करण्यात आली . यामध्ये पुरुषोत्तम भगत निशाण आखाडा , कालू भगत भगत निशाण आखाडा , रामलाल भगत निशाण आखाडा या चार निशाणांची स्थापना करण्यात आली . यावेळी निशाणांची स्थापना हरकानगर , नवा मोदीखाना , सोलापूर बाजार न्या भागात भव्य मिरवणूक काढण्यात आली . यावेळी मोठ्या संख्येने भक्त सहभागी झाले होते . यावेळी हरकानगर तरुण मंडळाच्यावतीने सर्व निशाण प्रमुखांचे स्वागत श्रीफळ आणि हार देउन मंडळाचे अध्यक्ष शैलेश चव्हाण यांनी केले . यावेळी गोपी वाघेला , गोपाळ वाघेला , हेमराज साळुंके , नितीन रहिस्वाल , गणेश चव्हाण , योगेश कंडारे , महेश जाधव व भक्त सहभागी झाले होते . यावेळी सर्व निशाणांची पूजा करून स्थापना करण्यात आली . त्यानंतर सर्वानी महाप्रसादाचा लाभ घेतला . रात्री भजन झाले .

