पुणे – आगामी निवडणुकांमध्ये जातीयवादी पक्षाचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे , त्यासाठी कार्यकर्त्यांचे जाळे बांधून बूथ कमिट्या मजबूत करण्याचे आवाहन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार यांनी केले . समता भूमी येथील सावित्रीबाई फुले स्मारकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्यावतीने आयोजित कार्यकर्त्याना मार्गदर्शन अजितदादा पवार बोलत होते . त्यांनी सांगितले कि , नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपची लाट ओसरत चालली आहे . जनतेला खोटी आश्वसनें देउन हे सरकार सत्तेवर आलेले आहे . आतापर्यंत कोणतीच आश्वासनाची पूर्तता सरकारने केलेली नाही . त्यामुळे हे सरकार अपयशी ठरले आहे . पुण्यातील आठही विधानसभा मतदार संघावर झेंडा फडकाविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे . झोकून देउन पक्षाचे काम करा , पक्षाला मजबूत करा . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्तेत असताना सर्व समाजाला संधी दिली आहे . त्याचा निश्चितच पक्षाला फायदा मिळणार आहे . या कार्यकर्ता मेळाव्यास पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार ऍड. वंदना चव्हाण , प्रदेश प्रवक्ते ऍड अंकुश काकडे , आमदार ऍड. जयदेवराव गायकवाड , मेळाव्याचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष भोलासिंग अरोरा ,निरीक्षक निलेश निकम , माजी आमदार कमल ढोलेपाटील , महापालिका विरोधी पक्षनेते चेतन तुपे , भगवानराव वैराट , माजी महापौर मोहनसिंग राजपाल , माजी उपमहापौर निलेश मगर , नगरसेवक प्रशांत जगताप , नगरसेवक प्रदीप गायकवाड , नगरसेविका रत्नप्रभा जगताप , पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर , पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राकेश कामठे , विद्यार्थी अध्यक्ष ऋषी परदेशी ,माजी नगरसेविका सुरेखा कवडे , ऍड, भगवानराव साळुंके , अशोक राठी , माजी नगरसेवक शांतीलाल मिसाळ , कासम शेख , भारत कांबळे , प्रदीप देशमुख , संदीप नवघणे आदी मान्यवर उपस्थित होते .
या मेळाव्याचे प्रास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष भोलासिंग अरोरा यांनी केले तर सूत्रसंचालन उध्दव बडदे यांनी केले तर आभार राहुल तांबे यांनी मानले . या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या महिला अध्यक्षा मीना पवार , युवती अध्यक्षा पूजा वाघमारे , युवक अध्यक्ष विशाल नाटेकर , नरेश जाधव , मयूर गायकवाड , मुनीर सय्यद , फईम शेख , कुलदीपसिंग टूटेजा , युसूफ शेख , समीर शेख ,पोपट गायकवाड , चेतन मोरे , रणजित परदेशी , सुनिल पडवळ , जनार्दन जगताप , संदीप गाडे , सुनील भोईटे , नितीन रोकडे , मंगेश मोरे , शिवाजी शिंदे , महेंद्र लालबिगे , गणेश लांडगे ,आदी मान्यवर व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

