पुणे-माळी आवाज संस्थेच्यावतीने माळी समाजाचा राज्यस्तरिय वधूवर परिचय मेळावा उत्साहात संपन्न झाला . या मेळाव्याचे उदघाटन माजी आमदार कमल ढोलेपाटील यांच्याहस्ते संत शिरोमणी सावता महाराज , महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करून करण्यात आले . वानवडीमधील केदारी गार्डनमध्ये झालेल्या या मेळाव्यास प्रमुख पाहुणे साताराचे माजी नगराध्यक्ष राजू भोसले , कृषिभूषण पुरस्कार विजेते आनंदराव गाडेकर , सेवा निवृत्त न्यायाधीश माधानता झोडगे , विठ्ठलराव केदारी , दिनेशप्रसाद होले आदी मान्यवर उपस्थित होते .
या मेळाव्यामध्ये ३१२ वधू तर १८३ वर सहभागी झाले होते . यावेळी माजी आमदार कमल ढोलेपाटील यांनी सांगितले कि , भावी आयुष्य उज्वल घडविण्यासाठी एकमेकांची मने जुळविली पाहिजे . तसेच लग्न जमविताना तडजोड हि असलीच पाहिजे , मनपसंत जोडीदार मिळविण्यासाठी वधू वर मेळावे वधू वर यांना फायदेशीर ठरत आहे . नुसती नोकरी आणि उच्च पगार पाहू नका तर स्वभाव , आवडी निवडी सुध्दा पहा असे त्यांनी वधू वरांना आवाहन केले .
या मेळाव्याचे प्रास्तविक व उपस्थितांचे स्वागत विजयकुमार लडकत यांनी केले तर सूत्रसंचालन पांडुरंग गाडेकर यांनी केले तर आभार रोहिणी बनकर यांनी मानले .

