Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

जगातील सर्वात मोठा असा डोम साकारतोय राजबागेत

Date:

पुणे – एकशे साठ फूटाचा व्यास, दोनशे पंधरा फूट उंची, साठ हजार चौरस फूटाचा सभामंडप, भव्य ग्रंथालय, अठ्ठेचाळीस संत-तत्वज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या पुतळ्यांचा वेढा, चहुबाजूला मिनार, संगमरवरातील आकर्षक काम, नेत्रदीपक कमानी आणि कारंजे अशा स्वरुपाचा भव्यदिव्य आणि जगातील सर्वात मोठा असा डोम (घुमट)  लोणी काळभोर येथील राजबागेत आकाराला येतो आहे .
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे संस्थेच्या वतीने आणि प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांच्या संकल्पनेतून राजबाग, लोणी काळभोर येथील ‘भारतीय संस्कृती-ज्ञान दर्शन’च्या परिसरात हे ऐतिहासिक स्वरुपाचे विश्‍वशांती प्रार्थना केंद्र उभे राहत आहे.
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांच्यासह वास्तुशास्त्रातील विविध तज्ज्ञांनी या डोमच्या कामाची पाहणी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागाचे माजी अधिष्ठाता प्रा. एस. बी. बोंडे, वरिष्ठ रचनात्मक सल्लागार अरुण पुरंदरे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे माजी प्रमुख डॉ. एन. आर. पटवर्धन आणि डॉ. एस. एम. देशपांडे, विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रमुख डॉ. एच. के. अभ्यंकर, हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठातील अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता डॉ. किशोर रवंदे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस. एन. पठाण, एमआयटीचे डॉ. टी. एन. मोरे, एमआयटी स्कूल ऑफ टेलिकॉमचे प्रकल्प संचालक डॉ. मिलिंद पांडे, एमआयटीच्या अप्लाईड मेकॅनिक्सच्या विभागप्रमुख डॉ. मृदूला कुलकर्णी, एमआयटी सीओईचे संचालक डॉ. आर. व्ही. पुजेरी, प्रा. विष्णू भिसे आदी उपस्थित होते.
डोमच्या उभारणीविषयी पत्रकारांना माहिती देताना प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचे दर्शन घडविणार्‍या या परिसरात भव्यदिव्य डोमची उभारणी होणे, हे आमचे भाग्य आहे. जगातील सर्वात मोठा व्यास, उंची असलेला हा डोम पुढील दीड-दोन वर्षात बांधून पूर्ण होईल. विश्‍वशांती प्रार्थना सभागृह आणि विश्‍वशांती ग्रंथालय येथे उभारले जात आहे. या सर्व उभारणीमध्ये रचनाकार अथवा सल्लागार नेमलेला नाही. याची सर्व आखणी व काम एमआयटीतील कर्मचारी करीत आहेत. या कामाची अचूकता सूक्ष्मपद्धतीने पडताळली जात असून, मिलिमीटरचाही फरक होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे, याचा आनंद आहे. अशा अद्भूत पद्धतीच्या बांधकामाचा अभ्यास स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थी, शिक्षकांनी करायला हवा.”
डॉ. सुभाष बोंडे म्हणाले, “या डोमच्या निमित्ताने एक वेगळ्या प्रकारचे बांधकाम आपल्या समोर उभे राहत आहे. विद्यार्थ्यांना यावर संशोधन करता येईल, असे हे काम आहे. या डोमची उभारणी, त्याचे स्वरुप, कामाची पद्धत, रचना, त्यामध्ये वापरलेले साहित्य याचा विश्‍लेषणात्मक अभ्यास विद्यार्थी व शिक्षकांनी करायला हवा. त्यातून जगातील विविध वास्तू उभारण्यामागील कल्पना लक्षात येण्यासही मदत होईल. जगभरातून लोक हा डोम पहायला येतील.”
डॉ. एच. के. अभ्यंकर म्हणाले, “खूप वर्षानंतर एका चांगल्या वास्तूची उभारणी होत आहे. येथून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडणार असून, ते पाहण्यासाठी जगभरातून असंख्य लोक येतील. या रचनेचा अभ्यासही करतील. रोम येथील सेंट पीटर्स डोमपेक्षा अधिक हा डोम मोठा आहे.”
एस. एम. देशपांडे म्हणाले, “कोणतेही बांधकाम उभारताना सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. या डोमच्या उभारणीमुळे पुण्याच्या वैभवात भर पडणार आहे.”या डोमच्या कामाच्या उभारणीत लागणारी तांत्रिक मदत करण्यास नेहमी तत्पर आहोत, असे डॉ. एन. आर. पटवर्धन यांनी सांगितले.डॉ. मिलिंद पांडे म्हणाले, “डॉ. कराड यांचे कार्य मानवजातीच्या कल्याणासाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक विलक्षण आनंद मिळतो.” अरुण पुरंदरे यांनीही डोमच्या उभारणीविषयी आपले मत व्यक्त केले. विष्णू भिसे यांनी बांधकामाच्या उभारणीतील बारकाव्यांची, रचनेची माहिती सांगितली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...