9 वा तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली जागतिक शांतता पुरस्कार 2017 अमेरिकेतील एल्डर डी. टॉड ख्रिस्तोफरसन यांना जाहीर

Date:

पुणे,दि.9 ऑगस्ट: ‘डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ आणि विश्‍व शांती केंद्र (आळंदी)पुणेतर्फे तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊलींच्या नावाने दिला जाणारा एक अत्यंत प्रतिष्ठेचा, ऐतिहासिक स्वरूपाचा व नोबेल शांतता पारितोषिकाच्या धर्तीवरील 9वा ‘तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्‍वर माऊली जागतिक शांतता पुरस्कार 2017’ अमेरिकेतील चर्च ऑफ जीझस ख्राइस्ट लॅटर डे सेंट्सचे प्रमुख मार्गदर्शक एल्डर डी. टॉड ख्रिस्तोफरसन यांना, संत श्री ज्ञानेश्‍वर महाराजांची जयंती व गोकुळ अष्टमीचे औचित्य साधून, सोमवार दि.14 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10.00 वा. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणातील स्वामी विवेकानंद सभामंडप येथे प्रदान करण्यात येणार आहे.

सदरील आंतरराष्ट्रीय कीर्तीचा विश्‍व शांती पुरस्कार, नोबेल चॅरिटेबल ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉ.मायकेल नोबेल आणि महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शुभहस्ते आणि पुण्याच्या मा. महापौर सौ. मुक्ता टिळक यांच्या सन्माननीय उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.

तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर विश्‍वशांती पुरस्कार समितीचे अध्यक्ष आणि जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. आर.ए. माशेलकर (एफआरएस), जगप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ.विजय भटकर, विख्यात गीतकार आणि पटकथा लेखक श्री जावेद अख्तर, इंडियन मर्चन्टस चेंबरचे माजी अध्यक्ष श्री नानिक रूपानी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर इतर मान्यवर या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

अमेरिकेतील मान्यवरांची उपस्थिती

विशेष बाब म्हणजे, सदरील संत श्री ज्ञानेश्‍वर विश्‍वशांती पुरस्कार प्रदान समारंभासाठी अमेरिकेतील जगविख्यात विद्यापीठांचे अध्यक्ष मा. डॉ. स्टीफन मॉर्गन, डॉ. मॅथ्यू हॉलंड, डॉ. डिनीस हुफ्तालिन तसेच उटाह टेक्नॉलॉजी कॉन्सिलचे अध्यक्ष डॉ. रिचर्ड नेल्सन आणि अनेक जगविख्यात शास्त्रज्ञ, आध्यात्मिक गुरू, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ञ, तत्त्वज्ञ, कुलगुरू, कुलपती, उद्योजक, अमेरिकेतील काही जाणकार पत्रकार, डिजीटल आणि प्रिंट मिडीयाचे प्रमुख अशा विविध क्षेत्रातील सुमारे 60 मान्यवर व्यक्तींचे शिष्टमंडळ यावेळी उपस्थित राहणार आहे.

तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली व जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचे ज्ञान-विज्ञानाधिष्ठित तत्त्वज्ञान व सिद्धांत पहिल्यांदाच जगासमोर मांडण्याच्या हेतूने, हा जागतिक स्तरावरील तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर माऊली जागतिक शांतता पुरस्कार दिला जात आहे.
हा प्रतिष्ठेचा ‘जागतिक शांतता पुरस्कार’ यापूर्वी आदरणीय माता श्री अमृतानंदमयी देवी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रवीशंकरजी, जपानच्या गोई पीस फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष श्री. हिरू सायोंजी – श्रीमती मासामी सायोंजी, साधू वासवानी मिशनचे आध्यात्मिक गुरू पूज्य दादा जे. पी. वासवानी, अक्षरधामचे प्रमुख स्वामीजी, तसेच, मानव एकता मिशनचे संस्थापक-अध्यक्ष महायोगी गुरू श्री. एम.(श्री.मुमताज अली खान) यांना प्रदान करण्यात आला आहे.

21 व्या शतकात भारत देश ‘ज्ञानाचे दालन / विश्‍वगुरू’ म्हणून उदयास येणार!

भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंदांनी 1897 मध्ये भाकित केल्याप्रमाणे विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात सुख, समाधान व शांती नांदेल व 21वे शतक हे भारताचे शतक असेल आणि आपला भारत देश ‘ज्ञानाचे दालन व विश्‍वगुरु’ म्हणून जगासमोर उदयास येईल, हे भाकित खरे होण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल असेल, असा आम्हाला विश्‍वास वाटतो.

‘विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून विश्‍वशांती’ या विषयावर दोन दिवसीय
जागतिक शिखर परिषद

भारतीय संस्कृती, परंपरा, तत्त्वज्ञान व अध्यात्मशास्त्र हे धर्म व अंधश्रद्धेवर आधारित असल्याच्या चुकीच्या संकल्पनेला छेद देण्यासाठी, या संत ज्ञानेश्‍वर माऊली जागतिक शांतता पुरस्कार प्रदान समारंभाचे औचित्य साधून, ‘विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून विश्‍वशांती’ या विषयावर दोन दिवसीय जागतिक शिखर परिषद रविवार, दि.13 ऑगस्ट 2017 आणि सोमवार दि. 14 ऑगस्ट 2017 या दरम्यान एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणातील स्वामी विवेकानंद सभामंडप येथे आयोजित करण्यात आली आहे.

सदरील जागतिक शांतता परिषदेसाठी महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री ना.श्री.सुधीर मुनगंटीवार हे प्रमुख अतिथी म्हणून दि. 13 ऑगस्ट रोजी उपस्थित राहणार आहे.

या परिषदेचा उद्घाटन समारंभ रविवार दि. 13 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10.00 वा. होणार आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण जी.माधवन नायर यांच्या शुभहस्ते या परिषदेचे उद्घाटन होईल. नोबेल चॅरिटेबल ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉ. मायकेल नोबेल हे विशेष सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तसेच, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, वेस्ट मिन्स्टर कॉलेजचे अध्यक्ष डॉ. स्टीफन मॉर्गन, सुप्रसिद्ध पत्रकार डॉ. फिरोज अहमद बख्त व साल्ट लेक कम्युनिटी कॉलेजचे अध्यक्ष डॉ. डेनिसी हफ्तालिन हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 

सदरील जागतिक शांतता परिषदेस ब्ल्यूपाल सोल्यूशन्स प्रा.लि.चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजू मंथेना, उटाह टेक्नॉलॉजी कॉन्सिलचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रिचर्ड आर. नेल्सन, एलएलसी क्लार्क कॅपिटल पार्टनर जेम्स क्लार्क, स्विझरलँन्ड मधील जिनीव्हा येथील इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या प्रोग्राम डायरेक्टर डॉ. लारा श्रीवास्तव, पुण्याच्या लाइफ स्कूलचे संचालक नरेंद्र गोइंदानी, सामाजिक विचारवंत आणि तत्त्वज्ञ आर्य समाजी विद्वान स्वामी अग्निवेशजी, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी-साल्ट लेक कम्यूनिटी कॉलेजच्या प्रा.जेनीफर क्लेन्क, राज्य सभेचे माजी खासदार जमियत उलेमा ए हिंदचे सरचिटणीस मौलाना मोहम्मद मदानी, उत्तर प्रदेश मधील मथुरा वृंदावन येथील श्रीमान मध्व गौडेश्‍वर वैष्णव आचार्य श्री पुंडरिक गोस्वामीजी हे आपले विचार मांडतील.

या परिषदेचा समारोप समारंभ सोमवार दि. 14 ऑगस्ट 2017 रोजी दुपारी 03.00 ते 4.30 या दरम्यान होणार आहे.

अशी माहिती डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या कार्यकारी संचालिका प्रा. स्वाती कराड-चाटे, एमआयटी डब्ल्यपीयूचे कुलसचिव प्रा. डी.पी. आपटे आणि मिटसॉटचे संचालक डॉ. मिलींद पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ, कबड्डी स्पर्धा नागपूर, कुस्ती स्पर्धा बीड तर खो-खो स्पर्धेचे बारामती येथे आयोजन

महाराष्ट्राची क्रीडा परंपरा अधिक बळकट करण्यासाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा-उपमुख्यमंत्री...

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक

सेफ्टी ऑडिट अहवालाचा आढावा; पॅनिक बटण व्हॉट्सअ‍ॅपशी जोडण्याचे व...

करारी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पूजा सावंत

मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं...

राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांना उमेदवारी

मुंबई- राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील विनोद तावडे, रामदास आठवले,...