वेदिक विज्ञानामुळे संपूर्ण मानवजातीचे कल्याण ः डॉ भटकर – एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या महर्षी वेदव्यास एमआयटी स्कूल ऑफ वेदिक सायन्सचे उद्घाटन
पुणे :“वेदिक सायन्सचा अभ्यासक्रमामुळे मानवाच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन येईल. त्यामुळे विद्यार्थांनी कार्पोरेटक्षेत्रात चांगली नोकरी मिळविण्यासाठी आणि केवळ अध्ययनासाठी याचा वापर न करता संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी करावा,” असा सल्ला नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ.विजय भटकर यांनी विद्यार्थांना दिला. राजबाग, लोणी-काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या महर्षी वेदव्यास एमआयटी स्कूल ऑफ वेदिक सायन्सच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी आर्ट, डिझाईन अॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन व स्तंभलेखक डॉ.दीपक रानडे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, महर्षी वेदव्यास एमआयटी स्कूल ऑफ वेदिक सायन्सच्या कार्यकारी संचालिका प्रा.स्वाती कराड-चाटे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. सुनिल राय, वेदिक सायन्सचे अधिष्ठाता डॉ. साई सुसरल, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, माजी कुलगुरू डॉ.सुभाष आवळे व डॉ. अरविंद कुलकर्णी हे उपस्थित होते.
डॉ. विजय भटकर म्हणाले,“वेदिक सायन्समध्ये संपूर्ण विश्वाचे ज्ञान दडलेले आहे. यामध्ये मानवाच्या जीवनशैलीबरोबरच संपूर्ण सामाजिक व्यवहाराचे विस्तृत ज्ञान समाविष्ठ आहे. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून मानवाची नवनिर्मिती होत आहे, त्यामध्ये वेदिक सायन्सची महत्वपूर्ण भूमिका असेल. बुद्ध आणि आइनस्टाइन म्हणजेच अध्यात्म आणि सायन्स हे परिवर्तनाचे स्त्रोत असेल. ज्ञानाची पद्धत सृजनात्मक असावी. आजही आपली ज्ञानेश्वरी, गाथा व उपनिषेद याला जगामध्ये तोड नाही. ते कधीही जुने होणार नाहीत,”
डॉ. दीपक रानडे म्हणाले,“ ज्ञान प्राप्त करण्यासाठी वयाची अट नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सदैव ज्ञान घेण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक मानवाच्या शरिरात काही सेल असतात त्यांना नियंत्रित करण्यासाठी आम्हाला अध्यात्माची व मन शांतीची गरज भासते. अशा वेळेस वेदिक सायन्स सारखा नवा पाठ्यक्रम महत्वपूर्ण आहे.,”
प्रा. डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ विज्ञान, अध्यात्म आणि तंत्रज्ञानाची जोड देऊन या विद्यापीठामार्फत विद्यार्थी घडविण्याचे काम केले जात आहे. वेदिक सायन्सच्या गोल्डन बॅचच्या विद्यार्थ्यार्ंंचे भविष्य उज्ज्वल आहे. या पाठ्यक्रमात भारतीय संस्कृती व ज्ञान दर्शन घडणार आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, विकार व विकृती या सारखे दुर्गुण दूर करण्याचे अध्यात्म शास्त्र आहे. स्वामी विवेकांनदांनी 1897 मध्ये सांगितल्यानुसार भारत संपूर्ण विश्वात ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल आणि ते आता साकार होतांना दिसत आहे,”
प्रा. डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले ,“ सामाजिक आणि भारताची आवश्यकता पाहून या वर्षापासून पाठ्यक्रम सुरू केला आहे. जागतिक दर्जाच्या या कोर्समध्ये विद्यार्थाना उद्योगजगत आणि विभिन्न संस्थांमध्ये भरपूर प्रमाणात वाव आहे.,”
डॉ. सुनिल राय म्हणाले,“ श्रद्धा, श्रम आणि समन्वय या तीन गोष्टीच्या आधारावर विद्यार्थी आपले जीवन घडवू शकतो. वेदीक सायन्स हा अभ्यासक्रम अध्यात्माशी जुळलेला असल्यामुळे येणार्या काळात प्रत्येक मनुष्याच्या जीवनात याची आवश्यकता भासेल. देवाने सर्वांना बुद्धि दिलेली आहे त्याचा वापर कसा करावा हे त्याचे त्याने ठरवावे,”
डॉ. साई सुसरल म्हणाले,“ आर्थिक, सामाजिक आणि तंत्रज्ञानाबरोबरच सर्वच क्षेत्रात भारत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. वेदिक सायन्सेस मधून पदवी घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी येणार्या काळात संपूर्ण जगाचे नेतृत्व करतील,”
आकांक्षा पांडे यांनी सूत्रसंचालन केले.
प्रा.स्वाती कराड-चाटेे यांनी आभार मानले.
विश्वशांती प्रार्थनेने कार्मक्रमाची सुरुवात होऊन राष्ट्रगीताने सांगता झाली.