पुणे, दि. 5 जून : पर्यावरण संवर्धनासाठी देशभरातील युनिव्हसिर्र्टी व कॉलेजमध्येे राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ कॅम्पस आंदोलन स्पर्धा जानेवरीत आयोजित करण्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री ना. प्रकाश जावडेकर यांनी केली. जागतिक पर्यावरण दिनी कोथरूड येथील डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कॅम्पस येथे स्मार्ट कॅम्पस क्लाऊड नेटवर्क (एससीसीएन)चे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी ते बोलत होतेे.
यावेळी एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिटयूशन्सचे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष आणि वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ कराड, टेर पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष आणि युएनईपीचे माजी अध्यक्ष डॉ.राजेंद्र शेंडे, एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिटयूशन्सचे उपाध्यक्ष प्रा. राहुल कराड, एमआयटी एडीटीचे उपाध्यक्ष डॉ.मंगेश कराड, प्रिन्सिपॉल व सल्लागार डॉ.जय गोरे, प्रा. प्रकाश जोशी व डॉ.मिलिंद पांडे उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले की, या स्पर्धेचा निकाल फे ब्रुवारीमध्ये घोषित करण्यात येईल. स्पर्धेतून युवक व विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धना विषयी जागरूकता निर्माण होईल. त्यामुळे देशाचा व अर्थातच संस्थेचा फायदा होईल. माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी ही वेस्ट इज बेस्ट ची सर्वोत्कृष्ठ प्रयोगशाळा असेल. देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण विषयाला अनुसरून भारताने पॅरिसमध्ये एक करार केला आहे. त्याचे नेतृत्व भारताकडे असेल. सबका साथ सबका विकास यानुसार शहरातील मुळा-मुठा नदीचे शुद्धीकरण करून कायाकल्प केला जाईल. त्यासाठी केंद्र सरकार ने 1,000 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच पुणे महानगरपालिकेने या संदर्भात विशेष तरतूद केली आहे. मानवजातीच्या रक्षणासाठी पर्यावरण सुरक्षा महत्वाची आहे. देशात कार्बन उत्सर्जन नियंत्रणासाठी विशेष कार्य सुरू आहे. त्यासाठी प्रत्येक राज्यात वृक्षारोपणचे कार्य जोरात सुरू आहे.या दृष्टीने भारतात कोळशावर प्रतिटन 400 रूपये कर लावण्यात आला आहे. वाढत्या प्रदूषणाला नियंत्रित करण्यासाठी सरकारने देशातील सर्व उद्योगपतींशी चर्चा केली आहे. वीज बचत, पाणी बचत, हवेतील प्रदूषण नियंत्रण या विषयावर सद्धा जोरदार कार्य सुरू आहे.
टेर पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष आणि युएनईपीचे माजी अध्यक्ष डॉ.राजेंद्र शेंडे म्हणाले की, स्मार्ट कॅम्पस क्लाऊड नेटवर्क (एससीसीएन) या उत्तेजनात्मक प्रकल्पाद्वारे एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे क्लाऊड बेस्ड डॅशबोर्डद्वारे इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आणि बिग डाटा अॅनालिसिस (बीडीए) प्रणाली प्रस्थापित केली जाईल. त्याामुळे कॅम्पसमधील ऊर्जा वापराच्या पद्धतीचे रिअल टाईम मॉनिटरिंग किंवा देखरेख करता येईल. क्लाऊड प्लॅटफॉर्ममुळे भारतातील व जगभरातील इतर कॅम्पसेसशी ते जोडले जाणे शक्य होईल. त्यामुळे ऊर्जा कार्यक्षमतेची तुलना करता येईल व एक स्पर्धात्मक वातावरण तयार होईल. या नेटवर्कमुळे ऊर्जा वापर, क्षमता व त्याचे प्रगत विश्लेषण माहितीसाठी उपलब्ध होऊ शकेल.
एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिटयूशन्सचे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष आणि डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा कराड म्हणाले की, एमआयटी डब्ल्युपीयु कोथरूड कॅम्पस व टेर पॉलिसी सेंटरचा हा संयुक्त प्रकल्प म्हणजे विज्ञान, अध्यात्म आणि शाश्वत विकास यांचे एकत्रीकरण असून त्यामुळे उज्वल भविष्यासाठी जगातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल पडेल.
डॉ.राजेंद्र शेंडे यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन डॉ. मिलिंद पांडे यांनी केले. प्रा.राहुल कराड यांनी आभार मानले

