Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

विश्‍वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतूचा लोकार्पण सोहळा

Date:

पुणे: भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी भाकित केल्याप्रमाणे, ‘२१वे शतक हे भारताचे शतक असेल आणि भारत खर्‍या अर्थाने ‘ज्ञानाचे दालन’ म्हणून जगासमोर उदयास येईल.’ या स्वामीजींच्या स्वप्नाला अनुसरून, भारतीय अस्मिता जागविण्यासाठी, तसेच भारत देशातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन, बौद्ध, जैन, यहुदी, शीख, झोरास्ट्रीयन इ. धर्मांची समाजाला खरी ओळख व्हावी व राष्ट्रीय एकात्मता साधली जावी, यासाठी विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत संस्थेच्या वतीने, लातूर जिल्ह्यातील रामेश्‍वर (रुई) या छोट्याशा गावात संपूर्ण जगभर विश्‍वशांतीचा, विश्‍वबंधुत्वाचा व पर्यायाने मानवतेचा संदेश पोहोविण्याच्या हेतूने विश्‍वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतू  या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.

या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा श्रीरामनवमीचे औचित्य साधून मंगळवार, दि.४ एप्रिल २०१७ रोजी सकाळी ९.०० वा. रामेश्‍वर (रूई) ता. जि. लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

जगातील सर्व धर्मांचे सार हे बंधुता, मानवता, सहिष्णुता, प्रेम, करुणा, दया, क्षमा आणि शांती हेच आहे आणि ‘विश्‍वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतू’ हाच मानवतेचा आणि विश्‍वशांतीचा मार्ग आहे, असा आम्हाला विश्‍वास वाटतो.

या ‘विश्‍वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतू’ लोकार्पण सोहळ्यासाठी सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून जगप्रसिद्ध संगणक तज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर, महान तत्वज्ञ व साधक स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज, आचार्य किशोरजी व्यास, नोबेल पारितोषिक विजेत्या  आयपीसीसी ग्रुपचे सदस्य डॉ. राजेंद्र शेंडे, लातूरचे पालकमंत्री ना. मा. श्री. संभाजीराव पाटील निलंगेकर,  ज्येष्ठ पत्रकार व थोर विचारवंत डॉ. वेद प्रताप वैदिक, माजी केंद्रीय मंत्री डॉ. आरिफ महम्मद खान, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांचे नातू िफरोज बख्त अहमद, लातूरचे खासदार डॉ. सुनिल गायकवाड, माजी खासदार श्री गोपाळराव पाटील, नवी दिल्ली येथील सुप्रसिद्ध कायदेतज्ञ अ‍ॅड. सिराज कुरेशी आणि ज्येष्ठ विचारवंत व समाजसेवी डॉ. अशोकजी कुकडे हे उपस्थित राहणार आहेत. थोर तपस्वी व साधक परमपूज्य श्री. श्रीकृष्ण कर्वे गुरूजी हे शुभशीर्वाद देणार आहेत.

लातूर जिल्ह्यातील रामेश्‍वर (रूई) हे दोन ते अडीच हजार वस्तीचे छोटे खेडे गांव आहे. या गावात हिंदू-मुस्लिमांच्या सहभागातून प्रभु श्रीराम मंदिर, जामा मस्जिद आणि सूफी संत हजरत जैनुद्दिन चिश्ती यांचा दर्गा यांची पुनर्बांधणी करून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश संपूर्ण जगाला दिला आहे. रामेश्‍वर (रूई) या गावातून  वाहणार्‍या सोनवळा नदीच्या एका तीरावर संत गोपाळबुवा महाराजांचे मंदिर व दुसर्‍या तीरावर जामा मस्जिद व हजरत जैनुद्दिन चिश्ती यांचा दर्गा आहे. श्रीराम व रहीम यांचे प्रतीक असलेल्या हिंदू-मुस्लिम संतांना जोडणारा असा विश्‍वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतू हा खर्‍या अर्थाने हिंदू-मुस्लिम ऐक्य साधणारा, विश्‍वबंधुत्वाची शिकवण देणारा आणि सर्व धर्मांमध्ये समन्वय साधून, विश्‍वशांतीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविणारा, कदाचित जगातील एकमेव असा मानवता सेतू आहे.

विश्‍वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतू म्हणजे लोकशिक्षणाचे एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे. हा सेतू जपानच्या पॅगोडा वास्तुपध्दतीवर आधारित असून उत्कृष्ट वास्तुशास्त्राचे मूर्तिमंत उदाहरण आहे. या पॅगोडामध्ये जगातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन, बौद्ध, जैन, शीख, झोराष्ट्रीयन (पारशी) व यहुदी-जुडाइझम या आठ धर्मांची माहिती, प्रमुख तत्वे व त्या-त्या धर्मातील भव्य शिल्प/चिन्हे, श्रद्धास्थानांचे अत्यंत आकर्षक व सुंदर अशा प्रचंड मोठ्या रेखीव फे्रमच्या रुपात मांडणी केली गेली आहे. त्यामुळे पॅगोडाच्या आतील भाग एखाद्या भव्य संग्रहालयासारखा भासत आहेे.

या विश्‍वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतू लोकार्पण सोहळ्याचे औचित्य साधून, माजी केंद्रीय मंत्री, एक थोर विचारवंत समाजसेवक, सर्वधर्मसमभावाचे प्रतीक डॉ. अरीफ महंमद खान आणि ज्येष्ठ पत्रकार व थोर विचारवंत आणि राजकीय विश्‍वलेषक डॉ वेद प्रताप वैदिक यांचा ‘समर्पित जीवनगौरव’ हा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल.

त्याचबरोबर समारंभादरम्यान फर्जाना युसुफ पटेल या संगणकशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करणार्‍या रामेश्‍वर (रुई) गावातील पहिल्या मुस्लिम युवतीचा, तसेच केरळ येथील मदरसामध्ये १२वीत शिक्षण घेणारी बेना फातिमा हिचे संस्कृत भाषेवर असलेले प्रभुत्व व ‘गायत्री मंत्र’ आणि ‘भगवद्गीता’  याचा अर्थ मुखोद्गत असल्यामुळे, त्यांचा विशेष गौरव या सोहळ्यात करण्यात येणार आहे.

अशी माहिती विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारतचे संस्थापक अध्यक्ष   प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड आणि राष्ट्रसंत तुकडोेजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू   डॉ. एस.एन.पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे कँटोन्मेंटमधील केंद्र शासनाच्या जागांवर जाहीर केलेल्या ‘वक्फ’ मालमत्तांची चौकशी करा

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ...

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी...

घराण्यांचे वेगळेपण जाणून घेतल्यास भिंतींचा अडथळा जाणवत नाही : पंडित अरुण कशाळकर

पुणे : गायनाची ज्ञानगंगा घराण्यातूनच उगम पावते आणि तो...

ध्वज दिन निधीला हातभार लावूया… सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करुया.. !

7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त राज्यस्तरीय...