पुणे : माईर्स एमआयटी अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, आळंदीे व दूरदर्शन (प्रसारभारती) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 2 मार्च ते शनिवार दि.4 मार्च 2017 या कालावधीत बालेवाडी येथे राष्ट्रीय पातळीवरील ‘रोबोकॉन – 2017’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे ( सीओईपी) संघाने विजेते पद मिळविले. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) हा संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत भारतातून 112 संघ सहभागी झाले होते.
जपान येथील टोकिओ येथे दि. ऑगस्ट 2017 मध्ये होणार्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोबोकॉन – 2017 मध्ये सीओईपी हा संघ भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
राष्ट्रीय पातळीवरील रोबोकॉन – 2017 च्या पारितोषिक वितरण समारंभासाठी कानपूर येथील आयआयटीचे माजी संचालक पद्मश्री डॉ. संजय धांडे, सौ. शिवानी मुकेश शर्मा, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विश्वनाथ दा. कराड, मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक श्री. शिवाजी फुलसुंदर, सौ. उषा विश्वनाथ कराड, कॅपजेमीनी इंडियाचे कार्यकारी उपाध्यक्ष किशोर विखे, मॅथवर्क इंडिया प्रा. लि. चे श्री. प्रशांत राव, रोहमचे व्यवस्थापकीय संचालक श्री. नाकामुरा दाइसुके, जेनेटीक्स इंडिया प्रा. लि.चे अतिरिक्त महाव्यवस्थापक नचिकेत जोशी, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा.पी.बी. जोशी, एमआयटीच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड-नागरे, एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे कार्यकारी संचालक व रोबोकॉनचे मुख्य समन्वयक डॉ. सुनील कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस.एन.पठाण, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे चे संचालक डॉ. बी. बी. आहुजा व आळंदी येथील एमआयटी अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. योगेश भालेराव हे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके देण्यात आली.
राष्ट्रीय पातळीवरील ‘रोबोकॉन इंडिया – 2017’ स्पर्धेमध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणेला सुवर्ण पदक, प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड अॅवार्ड आणि प्रा.बालकृष्णन अॅवॉर्ड देण्यात आले व एक लाखा रूपयाचे रोख पारितोषिक देण्यात आले. एमआयटी संघ उपविजेते ठरला त्यांना रौप्य पदक, मुकेश शर्मा अॅवॉर्ड व 50 हजार रूपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. त्याच प्रमाणे बेस्ट मॅन्युअल ऑपरेटर (वडोदरा इन्स्टिट्यूट ऑॅफ इंजीनियरिंग, वडोदरा), फास्टेस्ट जॉब कम्लीटिंग रोबो (सीओईपी, पुणे), बेस्ट इस्थेटिक रोबो (एमआयटी,पुणे), बेस्ट इनोव्हेटिव्ह डिझाइन (इन्स्टिट्यूट ऑॅफ टेक्नॉलॉजी, निरमा युनिव्हर्सिटी), बेस्ट आयडीया (कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे), बेस्ट रूकी अॅवॉर्ड (संजीवनी कॉलेज ऑॅफ इंजीनियरिंग, कोपरगाव), बेस्ट जजेस अॅण्ड रेफरीज चॉइस अॅवॉर्ड (झाकिर हुसेन इंजीनियरिंग कॉलेज,अलिगड युनिव्हर्सिटी) इत्यादी पारितोषिके देण्यात आली.
कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे ( सीओईपी) , एमआयटी आणि वडोदरा इन्स्टिट्यूट ऑॅफ इंजीनियरिंग कॉलेज इत्यादी संघांना मैथवर्क अॅवॉर्ड ट्रॉॅफी प्रदान करण्यात आले.
मुकेश शर्मा म्हणाले,“रोबोकॉन स्पर्धेमुळे संघभावना निर्माण होते .संशोधनामुळे नवीन कल्पना विकसित होऊन त्यामधून निर्माण होणारी उर्जा आपल्याला यशाकडे घेऊन जाते. नवनवीन आव्हाने आपण सहजपणे पेलू शकतो. एक चांगला विचार सर्व समाजासाठी उपयुक्त ठरु शकतो. चिकटीने व जिद्दीने आपण काम केले तर यश निश्चितच मिळते.’
डॉ. संजय धांडे म्हणाले की खेळा मध्ये खिलाडूवृत्ती अत्यंत गरजेची असून त्याचा अत्यंत चांगला प्रत्यय येथे दिसून आला. हीच खिलाडूवृत्ती भविष्यात ही फायद्याचे ठरेल.
शिवाजी फुलसुंदर म्हणाले मुकेश शर्मा यांच्यामुळे 12-13 वर्षांपासून रोबोकॉम स्पर्धा सुरू आहे. यातून जिंकणारा संघ भारताचे प्रतिनिधित्व करेल आणि नक्कीच खात्री आहे की जपान येथून विजेते होऊन परत येतील.
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ रोबोटिक्सचे ज्ञान आपण आत्मसात केले पाहिजे. त्यांनी युवकांना आवाहन केले की सदगुण आत्मसात केले पाहिजेत. तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान अद्यायावत करणे गरजेचे आहे. आजची तरूण पिढी देशाचे प्रतिनिधित्व करणार असून तुम्हींच देशाचे ब्रॅड अॅम्बेसिडर आहात.”
प्रशांत राव म्हणाले की, “ रोबोटिक्स हे उदयाचे भविष्य आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेणारे प्रत्येक खेळाडू विजेता असून येथे येणारा अनुभव व शिकायला मिळालेला अनेक गोष्टी भविष्यात उपयोगी पडेल.”
वृषाली डे व अभय बेलापट्टेे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

