पुणे: दूरदर्शन व एमआयटी अॅकॅडमी ऑफ इंजिनिअरींग आळंदी यांच्या तर्फे पुण्यात 2 ते 4 मार्च2017 दरम्यान बालेवाडी स्पोर्टस् कॉम्प्लेक्स येथे 12 व्या एबीयु राष्ट्रीय रोबोकॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेआहे. यातील विजेता संघ टोकयो मध्ये होणार्या एबीयु आंतरराष्ट्रीय रोबोकॉन 2017 मध्ये भारताचे प्रतिनिधित्वकरेल.दरवर्षीप्रमाणे आयआयटी,एनआयटीसह भारतातील 112 आघाडीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांची लढतहोणार आहे.रोबोकॉन हा उभरत्या अभियंत्यांसाठी रोबोटिक्समधील त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी सर्वांत मोठेव्यासपीठ असून यामुळे अद्यावत तंत्रज्ञान अंगीकृत करण्याची त्यांना संधी मिळते. हा त्यांच्याकरिता फक्त एकशैक्षणिक अनुभव नसून तंत्रज्ञान वापराचा एक अद्वितीय अनुभव असतो.
यावर्षीची संकल्पना ही असोबी – द लँडींग डिस्क ही संकल्पना असोबी या खेळाच्या अवतीभवती असूनरोबोकॉनमागील मुलभूत तत्त्वज्ञान दर्शविते.असोबी मुळ खेळामध्ये जिंकण्या-हरण्यापेक्षा कौशल्याचे प्रदर्शनअधिक महत्त्वाचे आहे.
माईर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटसचे संस्थापक अध्यक्ष व विश्वस्त प्रा.डॉ.विश्वनाथ कराड म्हणाले की,विद्यार्थ्यांमध्ये रोबोटिक्स तंत्रज्ञानाविषयी जागृती निर्माण करण्याकरिता आम्ही सतत कार्यरत असतो.त्यासाठीरोबोटिक्स कार्यशाळा,परिषदांचे नियमितपणे आयोजन करण्यात येते.तसेच जागतिक दर्जाची रोबोटिक्स लॅबोरेटरीदेखील प्रस्थापित करण्यात आली आहे. केवळ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये नव्हे तर शालेयविद्यार्थ्यांमध्ये देखील याचा प्रसार व्हावा यासाठी दरवर्षी ज्युनिअर रोबोकॉनचे देखील आयोजन केले जाते.
एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटसचे कार्यकारी संचालक व रोबोकॉनचे मुख्य समन्वयक डॉ.सुनिल कराड म्हणाले ,रोबोकॉन सारख्या पुढाकारांमुळे उभरत्या अभियंत्यांमध्ये रोबोटिक्सचे कौशल्य रूजविण्यास मदतहोते. त्याचबरोबर तंत्रज्ञानात इंटरडिसिप्लिनरी दृष्टीकोन प्रस्थापित करण्यास मदत होते.
दूरदर्शन मुंबईचे अतिरिक्त सरसंचालक मुकेश शर्मा म्हणाले की, रोबोकॉन स्पर्धा हा एक विशेष तांत्रिक खेळांचाउपक्रम असून जिथे सहभागी खेळाडूंमध्ये खिलाडूवृत्ती आणि संघभावनेचा मिलाफ पाहायला मिळतो.अशास्पर्धांमध्ये तांत्रिक क्षेत्रात उत्तम करण्याची तसेच स्पर्धेची भावना महत्वाची भूमिका निभावते. दूरदर्शन (प्रसारभारती) व आकाशवाणी सारख्या ब्रॉडकास्टर्सना हाच संदेश भारताच्या दुर्गम भागात घेऊन जाण्याची संधीया स्पर्धेमुळे मिळते.
2008 आणि 2014 मध्ये दोन आंतराष्ट्रीय स्पर्धांचे यशस्वीरीत्या आयोजन केल्यानंतर, दूरदर्शन व एमआय मिळून 2020 मधील पुढील स्पर्धांच्या आयोजनासाठी सज्ज आहोत.
एमआयटी कॅडमी ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. योगेश भालेराव म्हणाले की, प्रत्येक डाव हा दोन संघांमध्येखेळला जाईल. प्रत्येक संघाकडे एक रोबोट व संघात तीन सदस्य असतील, दोन विद्यार्थी व एक निर्दशक. रोबोटहा पूर्णपणे ऑटोमॅटिक असेल किंवा मॅन्युअली कंट्रोल्ड असेल तसेच तो विद्यार्थ्यांनी पूर्णपणे हाताने बनविलेलाअसावा. मैदानात एका कॉलमशी जोडलेले वेगळ्या उंची व जाडीचे गोलाकार आकाराचे सात स्पॉट्स असतीलज्यावर बीच बॉल ठेवलेला असेल. दोन्ही संघाच्या रोबोटकडे 50 डिस्क दिल्या जातील व किती वेळात संघाचीडिस्क बॉल ठेवलेल्या स्पॉट पर्यंत पोचते यावरून गुण दिले जातील. जो संघ यशस्वीपणे त्यांच्या डिस्क, बॉलठेवलेल्या ठिकाणी पोचवेल, तो संघ विजयी ठरेल. प्रथम व द्वितीय क्रमांका बरोबरच अनेक बक्षिसे सहभाग्यांनाप्रोत्साहित करण्यासाठी ठेवली आहेत. ज्यामध्ये एक लाख रुपये व सुवर्ण पदक यांचा समावेश असलेला डॉ. विश्वनाथ दा. कराड पुरस्कार, 50 हजार व रौप्य पदक यांचा समावेश असलेला मुकेश शर्मा पुरस्कार, 65 हजार रुपयांचा मॅथवर्क्स पुरस्कार तसेच प्रा. बालाकृष्ण स्मृती पुरस्कार आदींचा समावेश आहे.
सर्व भारतातून या स्पर्धेसाठी अर्ज स्वीकारण्यात येतीलराष्ट्रीय रोबोकॉन विजेते संघ टोकियो येथे होणार्या एबीयु इंटरनॅशनल रोबोकॉनस्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील. रोबोकॉन स्पर्धेचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून पाहायला मिळेल.