- श्री हनुमान जयंती निमित्त एमआयटीमध्ये कुस्ती स्पर्धा संपन्न.
पुणे,दि.१६ एप्रिलः “शक्ती आणि युक्तीचा मातीतील रंगत खेळ कुस्ती स्पर्धा गेल्या दोन वर्षापासून कोरोना मुळे बंद पडली होती. परंतू या वर्षी महाराष्ट्र दिन म्हणजेच १ मे २०२२ रोजी रामेश्वर (रुई) लातूर येथे ‘राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धा’ घेण्यात येणार आहेत.”अशी घोषणा विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ कराड यांनी केली.
विश्वशांती केंद्र,माईर्स एमआयटी, पुणे तर्फे श्री हनुमान जयंतीचे औचित्य साधून पुण्यातील मल्लांसाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या व्यायाम शाळेमध्ये कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.
या स्पर्धेमध्ये ६२ मल्ल सहभागी झाले होते. विजेत्या मल्लांना रोख रक्कमेची बक्षिसे देण्यात आली. ७० किलो वजन गटातील अनुदान चव्हाण व सौरभ उभे यांची उद्घाटनाची कुस्ती झाली. त्यामध्ये अनुदान चव्हाणे विजयी झाले. विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांनी एमआयटी परिसरातील श्री हनुमान मंदिरात महापूजा केली. त्यानंतर त्यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी अमेरिकेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार दास, डॉ. टी.एन.मोरे, डॉ. मिलिंद पात्रे, गिरीष दाते, प्रा. डॉ. पी. जी. धनवे, विलास कथुरे आणि कुस्ती कोच निखिल वनवे उपस्थित होते. या कुस्त्यांचे पंच म्हणून पैलवान बबनराव काशिद, पैलवान सुभाष मोहोळ, निलेश सातपुते, व बाळू सणस यांनी काम पाहिले.
कराड म्हणाले,“ आज या कुस्ती स्पर्धेमध्ये बाल मल्लांचा सहभाग मोठा होता, याचा मला आनंद वाटतो. कारण एमआयटीत बांधण्यात आलेल्या तालिमिचे आज सार्थक झाले. कुस्तीमुळे शक्ती आणि युक्तीचा विकास होतो. तर चारित्र्यसंवर्धन ही घडले जाते. व्यायामाबरोबरच अभ्यास ही करा. श्रध्दा आणि परिश्रमातूनच यश निश्चित मिळेल.”
खुला गट – विजेता कृष्णा शेप -उपविजेता साई पळसकर
८६ किलो – विजेता अनिकेत कंधारे – उपविजेता नितीन लांवड
७४ किलो – विजेता अभिषेक पोकळे – उपविजेता अर्थव घोलप
७० किलो – विजेता अनुदान चव्हाण – उपविजेता सौरभ उभे
६५ किलो – विजेता आकाश घोडके – उपविजेता चेतन वर्दीगे
६१ किलो – विजेता अजय मापारे -उपविजेता गणेश कुंभार
५४ किलो – विजेता तन्मय भगत – उपविजेता आर्यन देडगे
४६ किलो – विजेता सिद्धार्थ बोर्हाडे – उपविजेता देवराज म्हाळुंगे
४२ किलो – विजेता रोहिदास झंजाड – उपविजेता सुजल ठुबे
३२ किलो – विजेता पृथ्वीराज शिंदे -उपविजेता राजवीर कंरजावणे
प्रा.पी.जी धनवे यांनी प्रास्ताविक केले. विलास कथुरे यांनी आभार मानले.यावेळी परिसरातील असंख्य भाविक उपस्थित होते.

