सार्वजनिक आरोग्य सेवा, शिक्षण व संशोधनावर आधारित ऑनलाईन वर्ल्ड हेल्थ पार्लमेंट २१ जानेवारी पासून

Date:

पुणे, दि. १९ जानेवारी: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फार्मसी, पुणेतर्फे सार्वजनिक आरोग्य सेवा, शिक्षण आणि संशोधनावर आधारित चार दिवसीय ऑनलाईन वर्ल्ड हेल्थ पार्लमेंट दि.२१ ते २४ जानेवारी २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. आरोग्य सेवा परिसंस्थेमध्ये अग्रणी व उच्च स्तरीय सुधारणा करणे (Pioneering Disruptive Reforms in Healthcare Ecosystem) हा या पार्लमेंटचा प्रमुख विषय आहे.
विश्‍वराज हॉस्पिटल, पुणे, माईर्स मायमर वैद्यकीय महाविद्यालय, तळेगांव दाभाडे, पुणे आणि एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय, लातूर यांच्या सहकार्याने हे पार्लमेंट भरविले जात आहे.
वर्ल्ड हेल्थ पार्लमेंटचे उद्घाटन गुरूवार, दि. २१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११.०० होणार आहे. या समारंभासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, खासदार डॉ. अंबुमणी रामदास, सिक्कीमचे आरोग्य मंत्री डॉ. मणिकुमार शर्मा, जम्मू काश्मीरचे आरोग्य मंत्री असिया नक्काश, जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर सुप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर आणि महाराष्ट्राच्या कोविड १९ टास्क फोर्सचेे अध्यक्ष डॉ. संजय ओक हे सन्मानीय अतिथि म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे असतील.
रविवार, दि. २४ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ६.०० वा.या वर्ल्ड हेल्थ पार्लमेंटचा समारोप होणार आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्‍विनी कुमार चौबे, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, ओरिसाचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नाबा किशोर दास, खासदार भारती पवार, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आणि सुप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर आणि महाराष्ट्राच्या कोविड १९ टास्क फोर्सचेे अध्यक्ष डॉ. संजय ओक हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे असतील. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून वर्ल्ड हेल्थ पार्लमेंटचे आयोजन करण्यात येत आहे.
या वर्ल्ड पार्लमेंटध्ये १० सत्रे आयोजित केली आहेत. ती सत्रे खालीलप्रमाणे :
: कोविड-१९ आणि त्या पलीकडेः
सत्र १: कोविड-१९ मध्ये भारताचा प्रतिसादः व्हायरस पासून लसीपर्यंत
सत्र २: भारतीय आरोग्य क्षेत्रातील समस्या
: वैद्यकीय शिक्षणात सुधारणाः
सत्र ३ ःवैद्यकीय शिक्षणात साथीच्या रोगांचा समावेश आणि अभ्यास क्रमातील सुधारणा
सत्र ४ : पॅरामेडिक सेवांची क्षमता आणि पोहोचमध्ये सुधारणा
सत्र ५ : आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळाचे धोरण हे आरोग्य विकासास प्रतिबंध करते का
: संशोधन आणि नवनिर्मितीः
सत्र ६ ः औषध, वैद्यकीय उपकरणे आणि उपचारांसाठी संशोधनाला प्रोत्साहन
सत्र ७ : वैद्यकीय संशोधन ः जागतिक अनुभवातून शिकणे
सत्र ८ : एकात्मिक औषध संशोधन आणि आयुषची भूमिका
ःआत्मनिर्भर आरोग्य यंत्रणेच्या दिशेनेः
सत्र ९ : स्वावलंबी आरोग्य प्रणालीची दिशा आणि धोरण
सत्र १०: आरोग्य क्षेत्रातील नियामक सुधारणा
या पार्लमेंटमध्ये महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. प्रदिप कुमार व्यास, पद्मश्री डॉ. शशांक जोशी, नॅशनल इन्स्ट्टियूट ऑफ न्यूरोलॉजीच्या संचालिका डॉ. प्रिया अब्राहिम, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक डॉ. सुनिल गैरोला, फोर्टीस हॉस्पिटलचे संचालक डॉ. राहुल पंडित, रिलायन्स फाउंडेशनचे वैद्यकीय संल्लागार डॉ. गुसद दवेर, इंडियन एक्सप्रेसच्या वरिष्ठ संपादिका अनुराधा मस्करेन्हास, आयआय बंगलुरू चे योगा प्राध्यापक प्रतिक राज, प्रो. डॉ. गौतम सेन, डॉ. वसंत नागवेकर, पद्मभूषण डॉ.देवीशेट्टी, डॉ. पराश कोठारी, डॉ. जे.ए. जलाल, डॉ. एस.पी. कलंत्री, डॉ. जरिर उदवाडिया, डॉ. कृषव खंजर, डॉ. अमित नागपाल, डॉ. मंजिरी घराट, पद्मश्री डॉ. परवेज ग्रांट, डॉ. पराग संचेती, डॉ. सुचित्रा नागरे, डॉ. अदिती कराड, राजीव येरवडेकर, डॉ. दिलीप गोडे, ले.जनरल डॉ. एम.डी. व्यंकटेश, डॉ. कन्नन रंगरामानुजम, हिमाचल प्रदेशचे आरोग्य मंत्री डॉ. राजीव सैझल, डॉ. अरूण जामकर, डॉ.ओम श्रीवास्तव, डॉ. अजित देशपांडे, राजीव नाथ, डॉ. मृदुला बेले, डॉ. हेमंत भंसाली, शिवकुमार र्कुडाले, पद्मश्री शशांक जोशी, पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ, अभिजित राय चौधरी, डॉ. वाय. के. गुप्ता, डॉ. जयंत खंदारे, पद्मश्री वैद्य राजेश कोटेचा, पद्मश्री डॉ.दर्शन शंकर, आचार्य बाल कृष्णन, डॉ. भूषण पटवर्धन, डॉ. रोहित महादेव साने, डॉ. सुरेश बी. पाटणकर, डॉ. जवाहर जे. शाह, डॉ. नितिन कर्णिक, डॉ. धनंजय केळकर, डॉ. समीर जोग, डॉ. रमेश भ्रमाल , डॉ. मोहन जोशी, डॉ लाल हिंगोरानी, संजय सिंग, अरूण खन्ना, डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. दिलीप म्हैसेकर, डॉ. रवि वानखेडकर, सुरेश शेट्टी या पार्लमेंटममध्ये विचार मांडतील.
वर्ल्ड हेल्थ पार्लमेंटविषयी :
वैद्यकीय शिक्षण व त्यातील संशोधन समृद्ध करून व क्षमता सुधारणे. तसेच, आरोग्य सुविधा वाढवून आरोग्यसेवेतील दुरुस्ती करण्याच्या उपायांवर चर्चा करावी. ध्येय ठरविणारे आणि त्यामध्ये सक्रिय सहभाग घेणार्‍यांसाठी एक प्रभावी व्यासपीठ तयार करणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.
अशी माहिती महाराष्ट्र राज्याच्या टास्क फोर्स कोविड १९ चे अध्यक्ष डॉ. संजय ओक, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एन.टी.राव (ेपश्रळपश), प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, सल्लागार प्रा. डी.पी.आपटे, स्कूल ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. बी.एस.कुचेकर, व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे वरिष्ठ संचालक श्री. रविंद्रनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सविस्तर माहितीसाठी www.worldhealthparliment.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...