Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

संगीतातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश – रिकी केज

Date:

पुणे  :  “ मी दंतवैद्य शिक्षणाची पदवी घेतलीमात्र माझे मन कधीही त्या क्षेत्रात रमले नाही. जर माझे मनच त्या क्षेत्रात नव्हते तर मी चांगला डॉक्टर कसा झाला असतो. आणि म्हणूनच मी माझ्या आवड्त्या संगीताच्या माध्यमातून जगभर पर्यावरण रक्षणाचा संदेश देत राहिलो.” असे मत ग्रॅमी अ‍ॅवार्ड विजेते व जगविख्यात संगीतकार रिकी केज यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट व भारतीय छात्र संसद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानेआयोजित सातव्या भारतीय छात्र संसदेच्या दुसऱ्या  सत्रात वसाहतवादी  मानसिकता: समृद्ध परंपरा की अभिशाप ?  या विषयावर ते बोलत होते.
यावेळी जगविख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, वर्ल्ड हिंदू फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वामी विज्ञानंद, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विश्‍वनाथ दा. कराड, माईर्स एमआयटीचे उपाध्यक्ष व भारतीय छात्र संसदेचे प्रमुख समन्वयक प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी छत्तीसगढ मधील बस्तर येथील आमदार दीपक बेज यांना आदर्श युवा आमदार पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच युवा आध्यात्म गुरु पुरस्काराने आचार्य पुंडरिक गोस्वामी यांना सन्मानित करण्यात आले.
डॉ. माशेलकर म्हणाले ,“  भारताला पहिल्या जगाच्या मानसिकतेतून विचार करण्याची गरज आहे. तरच भारत जगाच्या पहिल्या पंक्तीमध्ये स्थान मिळवू शकेल. सत्या नाडेला, सुंदर पिचाई हे आजच्या युगातील युवकांचे आदर्श आहेत. उद्या कदाचित एखादा शिवम अ‍ॅपल सारख्या कंपनीचा सीईआ बनेल.”
  दुसऱ्याच्या मार्गावर चालण्यापेक्षा युवकांनी स्वतःचा  नवीन मार्ग निर्माण केला पाहिजे आणि एक दिवस सारा समाज तुमच्या मार्गावर चालेल. उच्च ध्येय हे खऱ्या तरुणाचे लक्षण आहे, जर तुम्ही एवरेस्ट चे लक्ष ठेवताल तर कमीत कमी कांचनजंगा पर्यंत तर पोहचतात. आजची पिढी ही अगोदरच्या पिढीपेक्षा प्रतिभावंत आहे कारण आजची पिढी बहुराष्ट्रीय कंपन्यात नोकर्‍या मिळवण्यापेक्षा स्वतः अशा  बहुराष्ट्रीय कंपन्या उभारून त्यामध्ये हजारो तरुणांना नोकऱ्या देण्याची महत्वाकांक्षा ठेवते. तरुणांना प्रतिभा, तंत्रज्ञान आणि विश्वास या तीन गोष्टी यशस्वी होण्याचा मंत्र असल्याचे सांगितले.
आय.टी म्हणजे इन्फॉर्मशन टेकनॉलॉजि नसून  इंडियन टॅलेंट आहे आणि उद्याचे जग हे भारतीय युवकांचेच आहे.
स्वामी विज्ञानंद म्हणाले, भारताने अनेक इंग्लिश विद्वान आणि  इंग्लिश साहित्य निर्माण केले परंतु असे काही ऐकण्यात नाही कि पश्‍चिमी देशांनी एखादा संस्कृत विद्वान पंडीत निर्माण केला.
स्वपन कुमार दत्ता म्हणाले, “ आमचा इतिहास आमचा प्राचीन काळ आम्हाला स्पष्टपणे दाखवतो की आम्ही वसाहतवादापेक्षा प्राचीन काळातच जास्त आनंदी राहत होतो, अशात वसाहतवाद ; शाप की वरदान विचारण्याचा प्रश्नच येत नाही.”
      सोबिया शबदार (महाराष्ट्र), काव्या ठाकूर (बंगाल), राजेश गुर्जर (मध्य प्रदेश), करिष्मा नायर (केरळ ), गुप्तल झिंगन (उत्तराखंड) या विद्यार्थ्यांनी त्यांची मनोगते व्यक्त केली.
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांनी प्रास्ताविक केले.
 श्रीमती नीलम शर्मा व प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी. पी. आपटे यांनी आभार    मानले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आज इंडिगोची ६५० हून अधिक उड्डाणे रद्द:६१० कोटी केले रिफंड,३०००प्रवाश्यांच्या बॅगा दिल्या परत …

मुंबई-आज इंडिगोच्या ६५० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली...

विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वात हिवाळी अधिवेशन तयारीचा सविस्तर आढावा

“वीजपुरवठा, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनात कोणतीही त्रुटी राहणार नाही...