Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

दुसर्‍या ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’चे आयोजन

Date:

पुणे: माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट (मिटसॉग), पुणे आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे  दि. १० ते १२ जानेवारी २०१८ या कालावधीत दुसर्‍या ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’ (एनटीसी) या तीन दिवसीय परिषदेचे कोथरुड, पुणे येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे. या दुसर्‍या ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’चे उद्घाटन आध्यात्मिक गुरू श्री. दलाई लामा यांच्या हस्ते होणार आहे. ‘शिक्षकांना प्रेरित करुन सक्षम पिढी घडविणे’ हा या परिषदेच्या आयोजना मागील उद्देश आहे.
महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययु), भारतीय छात्र संसद फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य प्राचार्य  महासंघ व विश्‍वशांती केंद्र (आळंदी), पुणे, युनेस्को अध्यासन व असोसिएशन ऑफ इंडियन कॉलेज प्रिन्सिपॉल्स फेडरेशन या संस्थांच्या सहकार्यातून ही अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय परिषद प्रथमच होत आहे. देशभरातून पदवी व पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमाचे ८,००० शिक्षक यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत.
डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या परिषदेचे चीफ पॅट्रन आहेत. महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.श्री. विनोद तावडे हे पॅट्रन आहेत.
या तीन दिवसांच्या परिषदेचा उद्घाटन समारंभ बुधवार, दि. १० जानेवारी २०१८ रोजी, तर समारोप शुक्रवार, दि. १२ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे. तीन दिवसीय परिषदेत एकूण सात सत्रे ठेवण्यात आली असून, विषय खालीप्रमाणे आहेत:
१. भारतातील उच्च शिक्षण : आढावा आणि भावी दिशा
२. भारतातील उच्च शिक्षणाचे जागतिकीकरणः योजना आणि नियोजन
     (इंडो-युएस व्हिजन २०३०, इंडो-युरोप व्हिजन २०३० व इंडो-ऑस्ट्रेलिया व्हिजन२०३०)
३. वैश्‍विक मूल्याधिष्ठित शिक्षण- विश्‍व शांतीचा पाया
४. उच्च शिक्षणातील गुणवत्ता- सत्य आणि सामोपचार
५. उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा उपयोग- फायदे विरूद्ध अडथळे
६. शिक्षकांचे प्रशिक्षण
७. शिक्षणाचे अर्थशास्त्र
याशिवाय विशेष अशा दोन ‘टीचर टू टीचर कनेक्ट’ सत्रांचेही आयोजन केले आहे.
या विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी शैक्षणिक, अध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, कला, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित केले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंग, डॉ. ए.बी. देशपांडे, डॉ. ए.के. सेन गुप्ता, डॉ.अनिल के गुप्ता, डॉ.अनिल माहेश्‍वरी, डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे, सुप्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ.सीएनआर राव, डॉ.देवी सिंग, डॉ.दिलीप रांजेकर, न्यायमूर्ती हेगडे, डॉ.एन.एम.कोंडप, डॉ. मनिष कुमार, डॉ. नरेंद्र जाधव, डॉ.नारायण मूर्ती, डॉ. पंडित विद्यासागर, डॉ.पी.बी.शर्मा, डॉ. वेद प्रकाश, डॉ. आय.के.भट,  डॉ.संजय धांडे, डॉ.स्कॉट हेरियॉट, डॉ. एस.परशुरामन, प्रा.डेरियल भट, डॉ.सुशील शर्मा, डॉ.प्रा.व्ही.जी.नारायण, डॉ. यज मेदूरी, जैन संत आचार्य लोकेश मुनी, डॉ. ध्यान सिंग रावत, डॉ. के.ई.सितारामन, प्रा.डॉ. जॉन्सन मायकेल व रायन परेरा आदि मान्यवर वक्ते प्रस्तावित आहेत.
आपल्या देशाला अनेक चांगल्या शिक्षकांची परंपरा आहे. त्यांनी आपल्या शिकविण्यातून प्रेम आणि आदर मिळविला. ध्येय, आदर्शवाद आणि निःस्वार्थी सेवा हीच त्यांची ओळख आहे. त्यातील अनेकांनी केवळ ज्ञान दिले नाही, तर मूल्ये आणि आदर्शाच्या सहाय्याने समाजाला एक दिशा दिली. अशाच राष्ट्रउभारणीच्या भावनेने भारलेल्या आणि केवळ शिक्षक म्हणून नाही, तर उत्तम संशोधक, संवेदनशील, समाजाभिमुख, प्रगतीशील, दिशादर्शक, प्रेरणादायी आणि तत्त्वनिष्ठ शिक्षकांची फळी निर्माण करण्याचे या परिषदेचे उद्दिष्ट आहे.
या राष्ट्रीय परिषदेच्या नियामक मंडळाचे फाऊंडिंग पेट्रन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ  डॉ.अनिल काकोडकर, चेअरमनपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, कार्याध्यक्षपदी प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, अध्यक्षपदी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी चे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे आहेत. डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड हे या परिषदेचे संस्थापक समन्वयक आहेत.
अशी माहिती नॅशनल टीचर्स काँग्रेसचे प्रमुख निमंत्रक व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे उपाध्यक्ष डॉ. नंदकुमार निकम, महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे महासचिव डॉ. सुधाकरराव जाधवर व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा.डी.पी.आपटे व एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे अधिष्ठाता प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रात लहान मुले ,मुली अन जमिनीही पळविणाऱ्या टोळ्या -देवेन्द्रजी तुम्ही करत काय आहात ?

पुणे-महाराष्ट्रात लहान मुले ,मुली अन जमिनीही पळविणाऱ्या टोळ्या प्रचंड...

11 सरकारी रुग्णालयातून ‘बोगस’ औषधींचे वितरण:मंत्र्यांची कबुली

नागपूर:राज्यातील सरकारी आरोग्य संस्थांमध्ये बोगस औषधांचा पुरवठा आणि वापर...

पुतिन यांनी पाकच्या PM ना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले

मॉस्को :पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ शुक्रवारी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर...