Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे आयोजन

Date:

पुणे : विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत यांच्यातर्फे शुक्रवार, दि. 30 व शनिवार, दि. 31 डिसेंबर 2016 रोजी सायंकाळी 5.15 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत विश्‍वराज बंधारा, विश्‍वशांती गुरुकुल, राजबाग, लोणी काळभोर येथे ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवस रंगणार्‍या या ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, दि. 30 डिसेंबर 2016 रोजी सायंकाळी 6.00 वाजता सुप्रसिध्द व्हायोलिनवादक पंडित अतुलकुमार उपाध्ये  यांच्या हस्ते होणार आहे.
अत्यंत निसर्गरम्य व सुंदर अशा परिसरात होणार्‍या या संगीत महोत्सवामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक श्री. महेश काळे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पखवाज वादक पंडित उध्दवबापू आपेगावकर (शिंदे), सुप्रसिध्द संतूरवादक श्री. ताकहिरो आराई, सुप्रसिध्द बासरीवादक श्री. अझरूद्दीन शेख, सुप्रसिध्द शास्त्रीय संगीत गायिका सौ. सानिया पाटणकर, प्रसिद्ध गायिका श्रीमती गोदावरीताई मुंडे, सुप्रसिध्द सुगम संगीत गायक श्री शशांक दिवेकर आणि व्हायोलिनवादक तेजस उपाध्ये यांची कला सादर होणार आहे. दि. 31 डिसेंबर 2016 रोजी विश्‍वशांती संगीत कला अकादमीचे शिक्षक व विद्यार्थीदेखील संगीताचा कार्यक्रम सादर करतील. कार्यक्रमाची सुरुवात  श्री.तुकाराम दैठणकर यांच्या  शहनाई  वादनाने  होईल.
भारतीय संस्कृती व परंपरेनुसार चैत्र शुध्द प्रतिपदा ‘गुढी पाडवा’ हाच खर्‍या अर्थाने नववर्ष दिन म्हणून ओळखला जातो. तथापि, 31 डिसेंबरचा दिवस हा नववर्ष दिनाची पूर्वसंध्या म्हणून वेगळ्याच पाश्‍चात्य स्वरूपातील जल्लोषात सर्व भारतात व जगातही साजरा केला जातो. परंतु, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि विश्‍वशांती संगीत कला अकादमी, पुणे या संस्थेच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण समाजामध्ये व विशेष करून तरूण वर्गाच्या मनामध्ये ‘स्वधर्म, स्वाभिमान व स्वत्व’ जागवून खर्‍या अर्थाने ‘भारतीय अस्मिता’ जागविण्याचा संस्थेचा एक विनम्र प्रयत्न आहे. ‘एमआयटी सांस्कृतिक संध्येच्या’ कार्यक्रमातून ‘संगीताच्या साधनेतून ईश्‍वर दर्शन व शांत रसाची अनुभूती’ देणारा एक आगळावेगळा अलौकिक आविष्कार सर्व जाणकार रसिकांना मंत्रमुग्ध करेल.
        विश्‍वशांती गुरुकुल येथील विश्‍वराज बंधार्‍याच्या विस्तीर्ण जलाशयात उभारलेल्या मंदिरस्वरूपी  श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी व श्री महाजलदेवता या तीन विशेष मंचांवरून शांतरसाची अनुभूती देणारा ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ हा विशेष कार्यक्रम दरवर्षी 30 व 31 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
दि. 1 जानेवारी 2017 रोजी सुरू होणार्‍या नव्या वर्षाची ही अभिनव सुरूवात भारतीय संस्कृतीला अनुसरून नामवंत, तसेच तरुण गायक व संगीतकार यांच्या सादरीकरणातून होणार आहे. एमआयटी  सांस्कृतिक  संध्येचा  समारोप दि. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री, त्याग व  समर्पणाचे  प्रतीक  असलेल्या यज्ञकुंडामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर, विकार, विकृती व विकल्पासारख्या दुर्गुणांची आहुती देऊन, स्वत:चे आणि संपूर्ण समाजाचे पुढील 2017 हे वर्ष अत्यंत सुखाने, समाधानाने व शांततेने पार पडावे यासाठी प्रार्थना करून संकल्प सोडला जाईल.
     या  सांस्कृतिक  संध्येच्या  कार्यक्रमात  सहभागी  होऊन  नाद-ब्रह्म-स्वरूपी ‘संगीताच्या साधनेतून, ईश्‍वर दर्शन व शांतरसाची अनुभूती’ घ्यावयाची असेल, त्यांनी  या  कार्यक्रमात  सहभागी व्हावे, असे  विनम्र आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
     अशी माहिती विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष               प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड  व विश्‍वशांती संगीत कला अकादमीच्या कार्यकारी संचालिका                    सौ. ज्योती ढाकणे आणि महासचिव श्री. आदिनाथ मंगेशकर यांनी दिली.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुतिन यांनी पाकच्या PM ना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले

मॉस्को :पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ शुक्रवारी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर...

मुंबईत येणार जगातील सर्वात मोठा GCC (जीसीसी) प्रोजेक्ट; ४५ हजार रोजगार निर्माण होणार.

मायक्रोसॉफ्टसोबत एआय सहकार्याची मोठी घोषणा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.12 -...

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेतील २ हजार २०७ उमेदवारांचे निकाल रद्द

पुणे, दि. १२ : ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी...

पुण्यातील चार तहसीलदारांसह दहा जण सस्पेंड

९० हजार ब्रास जादा उत्खनन कठोर कारवाईचे महसूल मंत्र्यांचे कठोर...