मंत्री छगन भुजबळ यांची मुळशी येथे स्वस्त धान्य दुकानास भेट; आयएसओ नामांकनास आवश्यक नियमावली पूर्ततेची केली पाहणी

Date:

पुणे, दि. 27 : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुळशी तालुक्यातील चाले या गावातील स्वस्त धान्य दुकानास अचानकपणे भेट दिली. शासनाने आयएसओ नामांकन प्राप्त करण्यासाठी ठरवून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन केले जाते की नाही याबाबतची पाहणी त्यांनी केली.

यावेळी मंत्री श्री.भुजबळ यांनी आयएसओ नामांकन आवश्यक असलेल्या अटी व नियमांनुसार रेशन दुकानातील वजनमापे काटा, धान्यवाटप प्रमाणपत्र फलक, दरपत्रक फलक, जिल्हा दक्षता कमिटी बोर्ड, तालुका दक्षता कमिटी बोर्ड, परवाना फलक, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार कीट, व्हिजीट बुक, तक्रार पुस्तिका, ऑनलाईन विक्री रजिस्टर या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आलेली आहे की नाही याची प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान स्वस्त धान्य दुकानदाराकडून आयएसओ नामांकन प्राप्त करण्यासाठी आवश्यक अटी व नियमांची पूर्तता करण्यात आल्याने सदर रेशन दुकानास आयएसओ प्रमाणपत्र देण्याची सूचना केली. स्वस्त धान्य दुकानदार धनंजय दाभाडे प्रामाणिकपणे सेवा करत असल्याबद्दल कौतुक करत आपले असेच चांगल्या पद्धतीने करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी नायब तहसीलदार सरिता पाटील, पुरवठा निरीक्षक दीपक चव्हाण, मंडळ अधिकारी तसेच तलाठी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि पुरवठा विभागाचे उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी यांच्या मार्गर्शनाखाली आयएसओ नामांकनासाठीची मोहीम पुणे जिल्ह्यात राबवली जात आहे.

जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने, जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन ढोले यासाठी सातत्याने तालुकानिहाय आढावा घेत आहेत. या मोहिमेला स्वस्त धान्य दुकानदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...