पुणे-इंडियाआर्टचे संचालक मिलिंद साठे यांनी काढलेल्या छायाचित्रांचे माय पिक्चर विथ देअर लिटल स्टोरीज या प्रदर्शनाचे उद्घाटन भोसलेनगरमधील इंडियाआर्ट गॅलरीत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
मिलिंद साठे यांनी काढलेली छायाचित्रे आणि त्यांचे विषय वैविध्यपूर्ण आहेत. ही छायाचित्रे पाहताना त्रिमितीचा भास होतो, बारकावे स्पष्टपणे दिसतात, त्यामुळे परिणामकारकता वाढते आणि रसिकांना निखळ आनंद घेता येतो, असे गौरवोद्गार डॉ. नारळीकर यांनी यावेळी काढले.
ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट, स्वर्णलता भिशीकर, सुभाष देशपांडे, आयसरचे संचालक डॉ. के. गणेश, आयुकाचे संचालक सोमक रायचौधरी यांची प्रमुख उपस्थिती.
पोर्ट ब्लेअरचे सेल्युलर जेल, जालीयनवाला बागेतील ऐतिहासिक भिंत, कुमाऊँतील डोंगररांगा, वृध्द महिला, भूतानमधील उत्सवातील नृत्य, दीवेआगर, गोवा येथील निसर्गसौंदर्य, हाजी अली, जेसरमेलमधील हस्तकलेतून साकारलेल्या बाहुल्या, पॉंडेचरीतील हातमाग कागद आदी ६३ छायाचित्रे त्यांच्या लघुकथांसह प्रदर्शित करण्यात आली आहेत. ११ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत भोसलेनगरमधील इंडियाआर्ट गॅलरीत विनामूल्य सुरू राहणार आहे.
प्रदर्शनातील छायाचित्रांच्या विक‘ीतून निर्माण होणारा सर्व निधी सोलापूरच्या ग‘ामीण भागात कार्यरत असणार्या ज्ञानप्रबोधिनीच्या हराळी प्रकल्पाला आणि ज्ञानप्रबोधिनीच्या ज्ञान सेतू या वनवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या प्रकल्पासाठी म्हणून देण्यात येणार असल्याची माहिती श्री. साठे यांनी यावेळी दिली. या दोन्ही प्रकल्पांची माहिती ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने प्रदर्शन ठिकाणी देण्यात येत आहे.