Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मधल्या सुट्टीचा ब्रेक (लेखिका :- पूर्णिमा नार्वेकर)

Date:

आता तरी शाळा सुरू होणार का?…कोणत्या राज्यात कधी सुरू होणार शाळा?… शाळा सुरू होण्यासंबंधी बातम्या सतत पेपरमध्ये येत असतात. ऑगस्ट महिना सुरुही झाला पण प्रत्यक्ष शाळा काही अजून सुरू झाल्या नाहीत. शाळा जूनमध्ये सुरू झाल्या खऱ्या पण आदल्या वर्षीप्रमाणे ऑनलाईनच. ऑनलाईन शाळा, ऑनलाईन पुस्तकं, ऑनलाईन परीक्षा आणि ऑनलाईन मित्रमैत्रिणींची भेट…सगळं काही ऑनलाईन पार पडतंय पण एक गोष्ट मात्र होत नाही आहे, जी शाळा सुरू असताना सर्वच विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असतात…ती म्हणजे पहिल्या चार पिरिएड्स किंवा तासांनी येणारी मधली सुट्टी.

या लॉकडाऊनमुळे मधल्या सुट्टीच्या मजेला मुलं आता पारखी झाली आहेत. शाळा ऑनलाईन सुरू होऊ शकतात पण मधली सुट्टी???

खरंतर मधल्या सुट्टीची १० मिनिटं सुद्धा अवर्णनीय आनंद देणारी असतात. त्या १० मिनिटांत आधी डबा खाऊ की खेळू की गप्पा मारू…काय करू नी काय अगदी गोंधळ उडालेला असतो. काही शाळांना दोन वेळा मधली सुट्टी असते. एक सुट्टी १० मिनिटांसाठी आणि दुसरी २० मिनिटांसाठी, तर काही शाळांना एकच मोठी मधली सुट्टी असते.

आमच्या शाळेत बुवा एकच मधली सुट्टी होती. मधल्या सुट्टीत चारपाच मैत्रिणींनी एकत्र बसून डबा खाण्याची मजा काही औरच होती. तुझ्या डब्यात काय भाजी? माझ्या डब्यात मी आज ही भाजी आणली आहे…याची चर्चा सुरू असतानाच डबे पटापटा उघडले जायचे. प्रत्येकीच्या वाटणीला एक एक चमचा भाजी यायची! पण तीच एक चमचा भाजी चवीने खाण्यातील आनंद आगळा होता. प्रत्येकीकडे वेगवेगळ्या पद्धतीने पदार्थ बनविले जायचे. निरनिराळे आस्वाद, शेअरिंग तिकडेच शिकलो. पारंपरिक पदार्थ खाण्याची सवय तेव्हापासून लागली. जिभेला खरी चव काय ते कळायला लागले. आताच्या पिझा-बर्गरच्या पिढीला याची मजा काय कळणार म्हणा! त्याकाळी सर्वच शाळांना कँटीन नव्हते त्यामुळे कंपल्सरी घरचा डबा घेऊन जावा लागायचा. डब्यामध्येही कंपल्सरी पोळीभाजी असायची. पॉकेटमनी ही संकल्पना जवळपास नव्हतीच. चैन म्हणून कधीतरी २ ते ३ रुपये मिळायचे वडापाव किंवा समोसापाव खाण्यासाठी. (शाळेतल्या कँटीनमध्ये तेच २-३ पदार्थ उपलब्ध असायचे.) आजी सांगायची, “महिन्यातून एकदाच मिळणार हो, नेहमी काही मिळायचे नाहीत. घरचा डबा आपला बरा.” त्यामुळे शाळेत काय पण कॉलेजमध्ये जायला लागल्यावर सुद्धा डबा न्यायची सवय होती. वायफळ पैसे खर्च करायचे नाहीत याची शिकवण त्यावेळच्या पिढीला छोट्या छोट्या प्रसंगातून आपसूकच मिळत होती, त्यासाठी वेगळे वर्कशॉप करायची वेळ आली नाही! 

एकच बटाट्याची भाजी असली तरी वर्षाच्या डब्यातली वेगळी अन् संध्याच्या डब्यातली वेगळी. आम्ही ४-५ जणी एकत्र डबा खायला बसत असू. कुणाचाही धक्का लागून डबा खाली सांडणार नाही याची काळजी घेऊन. एखादीच्या डब्यात जर आवडती भाजी असली तर ती जरा जास्तच मिळायची. शाळा भरल्यावर पहिल्या तासालाच डब्यात काय आणलं आहे ते विचारून झालेलं असायचं. त्यात मैत्रिणीच्या डब्यात आपला आवडता पदार्थ असेल तर पहिल्या तासापासून पोटात कावळे ओरडत असायचे. मधली सुट्टी कधी एकदाची होऊन डबा खातो आहे असे झालेले असायचे. डब्यात कधी पोळीभाजी, कधी फोडणीचा भात तर कधी तूप-साखरपोळी… ही तूप-साखरपोळी म्हणजे त्यावेळची घरगुती फ्रँकी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बरं, मधल्या सुट्टीत केवळ डबाच खायचा नसायचा तर भरपूर खेळायचं पण असायचं. पाच मिनिटांत डबा खाऊन चट्कन खेळायला पळायचं अशी प्लानिंग असायची. साखळी-साखळी हा सर्वांत आवडता खेळ. शाळेची जागाही मोठी होती त्यामुळे साखळी खेळायला खूप मजा यायची. मधली सुट्टी भरल्याची बेल वाजली तरी खेळ काही संपायचा नाही. अशा या मधल्या सुट्टीची धमाल आणि निखळ आनंद आमच्या पिढीने तरी मनमुराद अनुभवलं आहे.         

कालांतराने मधल्या सुट्टीचे नामांतर झाले रिसेस आणि त्यानंतर ब्रेक…कॅन्टिनचेही प्रस्थ वाढल्यामुळे सगळ्या सोयी मिळायला लागल्या, थोड्याफार प्रमाणात घरच्या डब्याचं महत्त्व कमी झालं. काही शाळांमधून दर दिवशी खायला काय आणायचं याचं मुळी वेळापत्रकच देतात. काही पालक मुलांना भरघोस पॉकेटमनी देतात. हल्ली मोठमोठ्या शाळेतील कँटीन म्हणजे मिनी हॉटेलच. तिथे वडापावपासून अगदी पावभाजीपर्यंत सरसकट पदार्थ उपलब्ध असतात.

आता मधली सुट्टी होत नाही. ऑनलाईन शाळा झाल्यापासून तर पाचच मिनिटांचा ब्रेक दिला जातो. त्या ब्रेकचा आनंद, ती मजा कुठे दिसत नाही. निरागस चेहरे आता कोमेजू लागले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलायला परत शाळा सुरू व्हायला हवी आणि मधल्या सुट्टीची बेल वाजायला हवी आहे. मधल्या सुट्टीला करोनामुळे लागलेला हा ब्रेक संपून डबा, खेळ, गप्पा, दंगामस्तीचा गोंगाट शाळेत व्हायला हवा आहे!

– पूर्णिमा नार्वेकर, दहिसर

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुतिन यांनी पाकच्या PM ना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले

मॉस्को :पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ शुक्रवारी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर...

मुंबईत येणार जगातील सर्वात मोठा GCC (जीसीसी) प्रोजेक्ट; ४५ हजार रोजगार निर्माण होणार.

मायक्रोसॉफ्टसोबत एआय सहकार्याची मोठी घोषणा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.12 -...

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेतील २ हजार २०७ उमेदवारांचे निकाल रद्द

पुणे, दि. १२ : ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी...

पुण्यातील चार तहसीलदारांसह दहा जण सस्पेंड

९० हजार ब्रास जादा उत्खनन कठोर कारवाईचे महसूल मंत्र्यांचे कठोर...